Samruddhi Mahamarg Route: मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार; 'समृद्धी'चा आणखी एक टप्पा खुला होणार, वाचा डिटेल्स

Mumbai To Nashik Via Samruddhi Highway: मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार आहे. समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार आहे. त्यामुळे टप्प्यात प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ वाचणार आहे.
Samruddhi Highway Route: मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार; 'समृद्धी'चा आणखी एक टप्पा खुला होणार, वाचा डिटेल्स
Samruddhi Highway UpdateSaam tv
Published On

मुंबई : समृद्धी महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार आहे. समृद्धीचा नवा टप्पा खुला झाल्यानंतर नाशिककरांचा मुंबईच्या दिशेकडील प्रवास सुकर होणार आहे.ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबई ते नाशिक अंतर तब्बल एका तासाने कमी होणार आहे.

Samruddhi Highway Route: मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार; 'समृद्धी'चा आणखी एक टप्पा खुला होणार, वाचा डिटेल्स
VIDEO: 'रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी', शेतकरी प्रश्नांवरून विरोधक आक्रमक; सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे, ठाणे हा ७६ किलोमीटरचा टप्पा खुला होणार आहे. हा टप्पा खुला झाल्यानंतर आमणे येथून इगतपुरीला पोहोचायला ४० मिनिटे लागणार आहेत.

या नव्या टप्प्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. नव्या टप्प्यातून वाहनचालकांसाठी १२० केएमपीएच वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इगतपुरी ते संग्रीला रिसोर्ट हे अंतर ७६ किमी असून तुम्हाला ४० मिनिटात पोहोचता येणार आहे. सध्या या मार्गावर संग्रीला रिसोर्टवरून इगतपुरीला पोहोचायला १.३० तास लागतो. लवकर खुल्या होणाऱ्या टप्प्यात एक दुहेरी बोगदा आणि दरीतून जाणारी मार्गिका असणार आहे. या मार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षेचाही विचार करण्यात आल्याचे अनिल गायकवाड यांनी सांगितले.

'शहापुरातील पुलाचंही काम सुरु आहे. या पुलाचा एक भाग ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होईल. या पुलाचा दुसरा भाग हा दोन महिन्यात पूर्ण होईल. २ किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूला जंगल असल्याने काम करणे आम्हाला एक आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.

Samruddhi Highway Route: मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार; 'समृद्धी'चा आणखी एक टप्पा खुला होणार, वाचा डिटेल्स
Sunil Kedar News: काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का! जिल्हा बँक घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

जुना मुंबई-नाशिक महामार्गाचा विस्तार करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचा मानस आहे. या टप्प्यात वडपे ते माजीवाडा असा २३.५ किलोमीटरचा टप्पा आहे. गायकवाड पुढे म्हणाले, 'या प्रकल्पाचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार आहे. या टप्प्यात मोठी वाहतूक कोंडी असते. या प्रकल्पाच्या कामादरम्यान, अवजड वाहतूक होत असलयाचे त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com