Gestational Diabetes : 'प्रेग्नन्सी' प्लान करण्याआधीच 'वजन' नियंत्रणात ठेवा; अन्यथा तुम्हालाही जडतील 'हे' आजार

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान शरीरात इन्सुलिन योग्यरित्या तयार होऊ शकत नसल्यामुळे गर्भवती महिला मधुमेहाची शिकार होते. जेस्टेशनल डायबेटिस हा मुलांसाठी आणि त्यांच्या आईच्या आरोग्याला धोका पोहचवू शकतो.
Gestational Diabetes
Pregnancy Health TipsSaam TV

प्रत्येक महिलेचा गर्भधारणेचा वेगवेगळा पण सुखद अनुभव असतो. आपल्या आरोग्याच्या स्थितीवर महिलांची गर्भधारणा अवलंबून असते. एकीकडे काही महिलांची प्रेग्नन्सी सुरळीत पार पडते तर दुसरीकडे काही महिलांना मधुमेहाचा धोका निर्माण होतो. यालाच 'गर्भधारणा मधुमेह' असेही म्हणतात.

Gestational Diabetes
Pregnancy Care: गरोदरपणात कोणत्या फळांचा आहारात सामवेश करावा?

यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतात. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान शरीरात इन्सुलिन योग्यरित्या तयार होऊ शकत नसल्यामुळे गर्भवती महिला मधुमेहाची शिकार होते. जेस्टेशनल डायबेटिस हा मुलांसाठी आणि त्यांच्या आईच्या आरोग्याला धोका पोहचवू शकतो.

चला तर मग गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या मधुमेहाबद्दल जाणून घेऊयात...

जेस्टेशनल डायबेटिस झाल्याचे कधी समजते?

२४ ते २८ आठवड्यांच्या दरम्यान गरोदर असलेल्या महिलेने मधुमेहाची चाचणी करणे महत्त्वाचे आहे. डॉ. गुप्ता सांगतात की, 5 महिन्यांनंतर रक्त तपासणी केल्यावर महिलेला रक्तातील साखरेची पातळी गर्भधारणेपूर्वीपेक्षा वाढलेली आढळते. तेव्हा जेस्टेशनल डायबेटिस झाल्याचे समजते.

गर्भधारणेदरम्यान कोणत्या महिलांना मधुमेह होतो?

PCOD ची समस्या : ज्या महिलांना PCOD ची समस्या आहे, अशा महिलेला गर्भधारणेदरम्यान मधुमेह होतो. त्यांचे मोठ्या प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स होतात.

मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास : ज्या महिलांच्या कुटुंबातील लोकांना यापूर्वीपासूनच मधुमेहाचा त्रास असेल अशा महिलेला गर्भधारणेदरम्यान मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

लठ्ठपणा

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जास्त वजन असलेल्या महिलांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका जास्त असतो. ज्या महिलांचा बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त आहे, त्या गर्भधारणेच्या मधुमेहाला बळी पडतात.

पहिल्या गर्भधारणेचा इतिहास : जर एखाद्या महिलेला तिच्या पहिल्या गर्भधारणेमध्ये गर्भधारणेचा मधुमेह झाला असेल, तर दुसऱ्या गर्भधारणेतही तो वाढण्याचा धोका असतो.

जेस्टेशनल डायबेटिस टाळण्यासाठी काय करावे?

गरोदर महिलेने नियमित सकस आहार घ्यावा. आपल्या आहारामध्ये पौष्टिक अन्न पदार्थांचा समावेश करावा. त्यामुळे जेस्टेशनल डायबेटिसची समस्या टाळण्यास मदत होते. दर २ तासांनी काही तरी खाणे गरजेचे आहे. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान काहीतरी सतत करत राहावे. त्यामुळे शरीराची हालचाल होते. रोज योगासने करावी. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. जास्तच त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निरोगी राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे

गर्भधारणेपूर्वी वजन नियंत्रित असणे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची प्रेग्नन्सी सुरळीत पार पडते. प्रसूतीनंतर ७ ते ८ महिन्यांत स्त्रीयांमधील इन्सुलिन कमी होऊन साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पण ज्या महिलांना गर्भावस्थेचा मधुमेह असतो त्यांना वयोमानानुसार टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Gestational Diabetes
Diabetes Symptomps: शरीरात 'ही' लक्षणे दिसल्यास सावधान..! तुम्हाला मधुमेह होऊ शकतो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com