ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गर्भधारणा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. या काळात महिलांना खूप काळजी घ्यावी लागते.
गरोदरपणामध्ये महिलांनी स्वत:सोबत पोटामधील बाळाची देखील काळजी घ्यावी लागते.
गरोदरपणामध्ये आपल्या आहारात भरपूर फळांचे सेवन केले पाहिजे. फळांमधील पोषक घटकांमध्ये आई आणि बाळाच्या आरोग्याला फायदे होतात.
गर्भधारणेदरम्यान सफरचंद खाल्यास बाळाची प्रतिकारशक्ती आणि शक्ती वाढते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि फॉलिक अॅसिड यासारख्या घटक आढळतात ज्यामुळे शरीरातील लोह शोषण्यास मदत करते
गर्भवती महिलांसाठी केळी सुपरफूड मानलं जातं. केळीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़