प्रत्येक गर्भवती महिलेची इच्छा असते की, आपली प्रसूती सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने व्हावी. यासाठी गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात महिलांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. योग्य आहारामुळे आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अशातच स्त्रीरोगतज्ज्ञांनी एका विशेष फळाचे महत्त्व सांगितले आहे. गर्भधारणेच्या ३६ व्या आठवड्यापासून या फळाचे सेवन केल्यास प्रसूतीच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते. हे फळ म्हणजे खजूर
खजूर चवीला गोड असण्यासोबतच अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतो. गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये खजूर खाल्ल्याने शरीराला प्रसूतीसाठी तयार होण्यास मदत मिळू शकते. स्त्रीरोगतज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, गर्भवती महिला ३६ व्या आठवड्यानंतर आपल्या आहारात खजुराचा समावेश करू शकतात. मात्र, खजूर खाण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या महिलांनी अधिक काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गर्भधारणेच्या ३६ व्या आठवड्यानंतर दररोज ४ ते ६ खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रत्येक महिलेची प्रकृती, रक्तातील साखरेची पातळी आणि गर्भधारणेची स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे ही मात्रा सर्व महिलांसाठी योग्य असेलच असे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खजुराचे प्रमाण ठरवावे.
प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाचे मुख मऊ होणे आणि उघडणे ही महत्त्वाची प्रक्रिया असते. गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यांत खजूर खाल्ल्याने गर्भाशयाचे मुख प्रसूतीसाठी तयार होण्यास मदत होऊ शकते. काही अभ्यासांमध्येही खजुराचे सेवन आणि गर्भाशयाच्या मुखाची प्रसूतीसाठी होणारी तयारी यांच्यात सकारात्मक संबंध आढळला आहे
काही महिलांमध्ये प्रसूतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत नैसर्गिकरीत्या प्रसूतीकळा सुरू होत नाहीत. अशा वेळी डॉक्टर औषधे किंवा वैद्यकीय पद्धतींच्या मदतीने प्रसूती सुरू करतात. या प्रक्रियेला 'लेबर इंडक्शन' असे म्हणतात.
गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यांत खजूर खाल्ल्याने शरीराला प्रसूतीसाठी तयार होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही महिलांमध्ये नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढण्यास हातभार लागू शकतो. मात्र, केवळ खजूर खाल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरी होईल असे नाही. बाळाची स्थिती, आईचे आरोग्य आणि इतर वैद्यकीय परिस्थितींवर प्रसूतीचा प्रकार अवलंबून असतो.
प्रसूतीनंतर महिलांच्या शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. या काळात पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे असते. खजुरामध्ये नैसर्गिक साखर आणि ऊर्जा देणारे घटक असल्यामुळे प्रसूतीनंतरच्या काळात शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
नाही, खजूर खाणे हा प्रसूतीसाठी शरीराची तयारी होण्यास मदत करणारा एक आहारविषयक उपाय असू शकतो. मात्र, नॉर्मल डिलिव्हरी होणे अनेक वैद्यकीय घटकांवर अवलंबून असते. बाळाची गर्भातील स्थिती, आईची प्रकृती, रक्तदाब, मधुमेह आणि प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थिती यांचा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीच्या अपेक्षेने कोणताही आहार किंवा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहणे हेच प्रसूतीच्या वेळी सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.