IVF Treatment : आयव्हीएफ उपचारादरम्यान काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Precautions to Take During IVF Treatment : आयव्हीएफ उपचारादरम्यान कोणत्या गोष्टींचे पालन कराल?
IVF Treatment
IVF TreatmentSaam Tv
Published On

Mistakes To Avoid IVF Treatment :

बदलती जीवनशैली, पर्यावरणीय बदल, तणाव, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), गर्भधारणेचे वाढते वय, धूम्रपान आणि अपुरी झोप अशा विविध कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे.

याव्यतिरिक्त वैद्यकीय इतिहास आणि अनुवांशिक परिस्थिती यांसारख्या घटकांमुळे वंध्यत्वावर परिणाम होऊ शकतो. आयव्हीएफ किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन, हा एक असा प्रजनन उपचार पर्याय आहे ज्यामुळे असंख्य जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न साकार करता येते.

IVF Treatment
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

पुणे येथील अंकुरा हॉस्टिपटलच्या संचालक 9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग डॉ. सुप्रिया पुराणिक म्हणतात की, पालकत्वाची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ हा एक उत्तम पर्याय आहे. भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या हा कठीण प्रवास असतो.

1. आयव्हीएफ उपचारादरम्यान कोणत्या गोष्टींचे पालन कराल?

1. सकारात्मक राहा:

सकारात्मक मानसिकता ठेवल्याने प्रक्रियेच्या परिणामांवर खूप चांगले परिणाम होऊ शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जे रुग्ण आशावादी वृत्तीने आणि सकारात्मकरित्या आयव्हीएफकडे वळतात त्यांचा यशाचा दर अधिक असतो.

2. दातांच्या आरोग्याकडे (Health) लक्ष द्या:

हिरड्यांचे रोग, जळजळ जी संपूर्ण शरीरात पसरते आणि गर्भधारणेत अडथळा आणते. आयव्हीएफ उपचारादरम्यान मौखिक स्वच्छता राखणे महत्वाचे आहे, त्यामुळे नियमित तपासणी करणे आणि योग्य ब्रशिंग आणि फ्लॉसिंग तंत्रांचा सराव करणे आवश्यक आहे. शरीरातील मल्टीविटामिन्सच्या कमतरतेवर उपचार करणे देखील आवश्यक आहे.

3. तणाव कमी करा :

प्रजनन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक हार्मोन्सवर तणावाचा परिणाम होतो. पुरुष आणि स्त्रियांमधील प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तणावापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. तणावाची पातळी कमी करण्यासाठी ध्यान आणि योगासारख्या (Yoga) विश्रांती तंत्रांचा स्वीकार करा.

IVF Treatment
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

4. वजन नियंत्रणात ठेवणे

योग्य बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असणे तसेच वजन नियंत्रणात राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. कार्बोहायड्रेटसचे प्रमाण मर्यादीत करणे, प्रथिनयुक्त आहार निवडणे गरजेचे आहे. जंक फुड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळा.

5. पुरेशी झोप घ्या

योग्य आयव्हीएफ केंद्राची निवड करा, दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करा,दररोज ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

2. या गोष्टी टाळाव्यात

1. केसांना रासायनिक रंग लावू नका:

केस (Hair) कलर करताना त्यात अनेक रसायने असतात जी हानिकारक ठरु शकतात. जे टाळूद्वारे शोषून घेतले जाण्याची आणि रक्तप्रवाहात प्रवेश करण्याची क्षमता असते. हे संप्रेरक पातळीमध्ये व्यत्यय आणू शकते.

2. धुम्रपान- मद्यपान टाळा:

धुम्रपान आणि मद्यपान केल्याने आयव्हीएफचा उपचार घेताना आपल्याला अनेक आव्हांनाचा सामना करावा लागू शकतो.

IVF Treatment
Best Couple Spots In Pune: पुण्यातील बेस्ट रोमँटीक कपल्स स्पॉट, प्रेमीयुगुलांसाठी स्वर्गच जणू

3. कॅफिनयुक्त पेये टाळा:

कॅफिन शरीरातील उष्णता वाढवते, ज्यामुळे मज्जासंस्था आणि प्रजननाच्या अवयवांवर परिणाम होतो. संशोधनातून कॅफीनचे जास्त सेवन केल्यास प्रजननक्षमतेत अडथळा येतो. आयव्ही उपचारादरम्यान यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. यामध्ये प्रक्रिया केले अन्न, फ्रोजन फुडचे सेवन टाळा, इंजेक्शन्सच्या वेळा चुकवू नका. मेडिटेशन करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com