Prayagraj Magh Mela 2026: प्रयागराजचा मेळा आजपासून सुरु! आत्ताच नोट करा विशेष स्नानाची तारीख

Magh Mela Special Snan Dates: प्रयागराज येथे 3 जानेवारी 2026 पासून माघ मेळ्याला सुरुवात होत असून त्रिवेणी संगमावर सहा प्रमुख विशेष स्नान पर्वांचे आयोजन करण्यात आले आहे.
Magh Mela Special Snan Dates 2026
Magh Mela Special Snan Datesgoogle
Published On

प्रयागराज हे धार्मिक ठिकाण अनेकांच्या ओळखीतलं असेलच. याच ठिकाण आजपासून म्हणजेच दिनांक ३ जानेवारी २०२६ पासून माघ मेळा सुरु झाला आहे. हा काळ माघ महिन्याचा असतो. कारण हिंदू पंचांगानुसार हा महिना खूप पवित्र आणि पुण्याचा मानला जातो. या महिन्यात केलेले स्नान, दान, जप आणि तप यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक फळ मिळतं. अशी धार्मिक मान्यता आहे. याच कारणामुळे उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजजवळ दरवर्षी माघ महिन्यात भव्य माघ मेळ्याचे आयोजन केले जाते. पुढे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

त्रिवेणी संगम, म्हणजेच गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर भरवला जाणारा हा मेळा श्रद्धा, आस्था आणि अध्यात्माचा संगम मानला जातो. या मेळ्यात देशभरातून तसेच परदेशातून लाखो भाविक, साधू-संत आणि कल्पवासी संगमात पवित्र स्नानासाठी येत असतात. यंदा मेळ्याला मध्ये 3 जानेवारीपासून सुरुवात ते 15 फेब्रुवारीपर्यंत शेवटचा दिवस असणार आहे.

Magh Mela Special Snan Dates 2026
Heart Attack: खरंच की काय? थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी चालल्यावर हार्ट अटॅकचा धोका वाढतो, तज्ज्ञांनी काय दिला इशारा?

यंदाच्या माघ मेळ्यात एकूण सहा प्रमुख स्नान पर्व असणार आहेत. ते पुढील प्रमाणे असणार आहेत.

1. 3 जानेवारी 2026 ला पौष पूर्णिमेला पहिले मुख्य स्नान होईल.

2. 14 जानेवारी 2026 ला मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्नान होईल.

3. 18 जानेवारी 2026 ला मौनी अमावास्येच्या दिवशी स्नान होईल.

4. 23 जानेवारी 2026 ला बसंत पंचमीच्या दिवशी स्नान होईल.

5. 1 फेब्रुवारी 2026 ला माघी पूर्णिमेच्या दिवशी स्नान होईल.

6. 15 फेब्रुवारी 2026 ला महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचे मुख्य स्नान होणार आहे.

स्नानाचे महत्व काय?

माघ महिन्यात वरील ६ स्नानांचे महत्व हिंदू धर्मात प्रचंड आहे. या दिवशी स्नान केल्याने आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी दूर होतात असे मानले जाते. कारण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अनेक खस्ता खाऊन पुढे जावे लागते. अशावेळेस लोक अध्यात्माकडे जातात. नंद्याच्या संगमावर स्नान केल्याने जीवनातल्या पापांचा नाश होतो आणि मानसिक शांतता मिळते. असे भाविकांचे मत आहे. यातले विशेष स्नान हे १८ जानेवारी रोजी होणार आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Magh Mela Special Snan Dates 2026
Chanakya Niti : नातेवाईकांना या ४ गोष्टी सांगूच नका, अन्यथा नाव खराब झालंच, वाचा चाणक्य काय सांगतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com