Mahakumbh Viral Video: अगं जरा तरी लाज बाळग! महाकुंभमेळ्यात टॉवेल गुंडाळून पोहचली मुलगी, गंगेतील डुबकी घेत केला व्हिडिओ व्हायरल

Prayagraj Mahakumbh Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी गंगेत स्नान करायला गेली, पण फक्त टॉवेलवर. तिने व्हिडिओ शूट करून व्हायरल देखील केला आहे.
prayagraj
prayagrajSaam Tv News
Published On

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. केवळ देशच नाही तर जगभरातील लोक यात सहभागी होत आहे. याठिकाणी संत आणि भक्तांचा मेळा भरतो. या महकुंभात अनेक सेलेब्रिटी आणि दिग्गच नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी गंगेत स्नान करायला गेली, पण फक्त टॉवेलवर. हो, ही मुलगी टॉवेल गुंडाळून गंगेत स्नान करण्यासाठी पोहचली आणि तिने व्हिडिओ शूट करून व्हायरल देखील केला आहे. ही मुलगी नक्की कोण? तिच्या या कृत्यामुळे अनेकांनी सोशल माध्यमांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी महाकुंभात पोहचली असून, स्नान करण्यासाठी लवकरच नदीत उतरणार आहे. तिने शरीराभोवती फक्त पांढऱ्या रंगाचा टॉवेल गुंडाळला आहे. घाटावर उपस्थित सर्व लोकांसमोरून जात ही मुलगी गंगेत स्नान करण्यासाठी उतरली. या मुलीला पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्या मुलीने व्हिडिओ देखील शूट केले आहे.

prayagraj
Sangli Farmer: धमकी अन् त्रासाला शेतकरी कंटाळला, संपवलं आयुष्य; मृत्यूपूर्वी केला व्हिडिओ

@samuelina45 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाच दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ जवळपास 70 लाख लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

एका सोशल मीडिया यूजरने कॅपशनमध्ये, 'अश्लीलता पसरवणाऱ्या मुलीला सांगायला हवं, हा गोवा किंवा मालदीवचा समुद्रकिनारा नाही. हा प्रयागराज महाकुंभ आहे. लोक श्रद्धेने इथे येतात. हे श्रद्धेचे केंद्र आहे, इथे अशा भोंगळपणाला थारा नाही, हे त्या मुलीला कुणीतरी समजावून सांगायला हवं.' तर दुसऱ्याने धार्मिक कार्यक्रमांमध्ये रील बनवू नयेत अशी कमेंट केली आहे.

prayagraj
Women Savings Scheme India: 'ही' सरकारी योजना महिलांसाठी ठरतेय खास, गुंतवणुकीवर व्याज मिळते जास्त, २ वर्षांत जबरदस्त कमाई

या मुलीवर पोलिसांनी कारवाई करावी, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने लिहिले की, या मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन तिला महाकुंभ काय आहे हे समजावून सांगितले पाहिजे. सध्या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मध्यामांमध्ये व्हायरल होत असून, या मुलीच्या कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com