Sakshi Sunil Jadhav
चाणक्य म्हणतात, प्रत्येकाला मदत करा पण मदत करताना तुमच्या महत्वाच्या किंवा यशाचं गुपित कधीच कोणाला सांगू नका.
पुढे चाणक्य नितीनुसार नातेवाईकांना कोणत्या गोष्टी सांगितल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं हे आपण जाणून घेणार आहोत.
चाणक्यांच्या मते, कधीही नातेवाईकांना तुमचा पगार, सेविंग्स, कर्ज या गोष्टी सांगू नका. याने त्यांच्या मनात तुमच्या विषयी लालचीपणा निर्माण होऊ शकतो.
तुम्ही कोणताही वैयक्तिक निर्णय घेतला असेल तर तो नातेवाईकांना सांगूच नका. तसेच मित्रांसोबतही शेअर करू नका.
तुमच्या घरातले कोणतेही भांडणे, वाद तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करू नका. याने तुमची चार माणसात बदनामी केली जाऊ शकते.
स्वतःचे किंवा तुमच्या कुटुंबाचे आजार, कमकुवतपणा किंवा विशेष परिस्थिती इतरांना सांगितल्यावर तुम्हाला अफवांना सामोरं जावं लागेल.
तुम्हाला नोकरीत, व्यवसायात किंवा कोणत्याही गोष्टीत अपयश मिळालं असेल तर ते नातेवाईकांना सांगितल्याने तुमच्यावर टिका करतील.
तुम्हाला जे मिळवायचे आहे. ज्याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेणार आहात. त्या गोष्टी इतरांना सांगू नका.