Sakshi Sunil Jadhav
तुम्ही जर एखाद्या महत्वाच्या प्रसंगी जन्माला आला असाल तर तुमचा आनंद दुप्पट होतो. पुढे आपण एक भन्नाट गोष्ट जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतली एखादी व्यक्ती पौर्णिमेला जन्मली असेल तर याचा अर्थ काय? त्यांच्यात कोणते गुण, महत्व असतं याबद्दल जाणून घेऊयात.
पूर्ण वर्षभरात एकूण १२ पौर्णिमा असतात. ज्या अत्यंत शुभ मानल्या जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवून भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. याने धनात वाढ होते.
पौर्णिमेला जन्मलेले लोक भाग्यवान असतात. याच दिवशी हनुमानाचा आणि वेद व्यास यांचा जन्म झाला होता.
पौर्णिमेला जन्मलेले लोक खूप सुंदर आणि मनाने चांगले असतात.
पौर्णिमेला जन्मलेल्या व्यक्तींवर चंद्राची छाया असते. कारण या दिवशी पूर्ण चंद्र दर्शन होते. यामुळे त्यांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होतो.
पौर्णिमेला जन्मलेले व्यक्ती खूप मेहनती असतात. तसेच त्यांच्या तल्लख बुद्धीचा ते योग्य वेळी वापर करून लाभ मिळवू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.