Heart Disease : 'या' छोट्या गोष्टीमुळे हृदयाला धोका जास्त, वर्षभरात ३५०००० लोकांनी गमावला जीव

Plastic is Harmful for Health: 2018 या वर्षामध्ये तब्बल साडेतीन लाख लोकांनी जगभरात हृदयाच्या आजारांनी जीव गमावला आहे. याला कारण म्हणजे तुमच्या घरातील एक गोष्ट आहे.
Plastic is Harmful for Health
Heart Diseasesaam tv
Published On

Health News: प्लॅस्टिक पिशव्यांवर जरी बंदी असली तरीही आपल्या घरात इतर अनेक गोष्टी प्लॅस्टिकच्या आहेत. आजकाल आपल्या घरात अधिकतर गोष्टी या प्लॅस्टिकच्याच असतात. मात्र लोकांना कल्पनाही नाहीये की, प्लॅस्टिक आपल्या शरीरासाठी किती धोकादायक आहे. खरं तर प्लॅस्टिकच्या गोष्टी आपल्या शरीरासाठी सायलेंट किलर आहे.

प्लॅस्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी फॅथेलेट्सचा वापर केला जातो. फॅथेलेट्सच्या हानिकारक परिणामांमुळे २०१८ मध्ये जगभरात हृदयरोगाने ३.५ लाखांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये सर्वाधिक मृत्यू ५५ ते ६४ वयोगटातील आहेत. एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

भारतात किती लोकांचा मृत्यू?

'ईबायोमेडिसिन' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, भारतात सर्वाधिक १,०३,५८७ मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर चीन आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. ३.५ लाख मृत्यूंपैकी जवळजवळ तीन चतुर्थांश मृत्यू दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक महासागर प्रदेशात झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी, २०० देश आणि प्रदेशांमध्ये फॅथेलेट्सच्या परिणामांचा अंदाज घेतला. यासाठी त्यांनी लोकसंख्या सर्वेक्षणातील आरोग्य आणि पर्यावरणीय डेटाचं विश्लेषण केलं.

Plastic is Harmful for Health
Garuda Purana: गरूड पुराणानुसार 'अशी' कामं करणाऱ्यांना मिळते नरकात जागा

हे संशोधन 'डाय-२-इथिलहेक्साइल फॅथेलेट' (DEHP) या प्रकारच्या पदार्थाबाबत होतं. याचा वापर फूड कंटेनरसारख्या वस्तूंमध्ये प्लास्टिक मऊ आणि अधिक लवचिक बनवण्यासाठी केला जातो.

आरोग्यासाठी धोकादायक आहे

न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील असोसिएट संशोधक आणि रिसर्चच्या प्रमुख लेखिका सारा हायमन यांनी सांगितलं की, जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण असलेल्या फॅथेलेट्स आणि त्यांच्यातील संबंधांवर आमचा निष्कर्ष असं दर्शवतो की, ही रसायने मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. संशोधनात असं समजलंय की, फॅथेलेट्स सूक्ष्म कणांमध्ये मोडतात आणि मानवी शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे लठ्ठपणा, प्रजनन समस्या आणि कॅन्सर यासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो.

Plastic is Harmful for Health
Blockages in arteries: शरीरातील रक्तवाहिन्या बंद झाल्यास पायांमध्ये सकाळी दिसतात 'हे' मोठे बदल, कसे कराल उपाय

२०१८ मध्ये, DEHP च्या दुष्परिणामांमुळे जगभरात ३,५६,२३८ मृत्यू झाले, जे ५५ ते ६४ वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूंपैकी १३.४९ टक्के असल्याची माहिती आहे.

Plastic is Harmful for Health
Yoga: पोटाची चरबी कमी करण्यासाठी 'हे' आहेत प्रभावी योगासन, नियमित सरावामुळे मिळवा चांगले परिणाम

हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संयुगाच्या संपर्कात आल्याने हृदयाच्या धमन्यांमध्ये जळजळ होऊ शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो. भारतातील प्लास्टिक उद्योग वेगाने वाढत असून प्लास्टिक कचरा आणि या सामग्रीचा व्यापक वापर फॅथेलेट्सच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्यास धोका निर्माण करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com