New Year Celebration : कमी खर्चात फॉरेन ट्रिप ! असे करा प्लानिंग

नवीन वर्षात आपण अशा अनेक ठिकांणाना भेट देण्याचा विचार करत असतो. पण पैशांच्या चिंतेमुळे आपला फिरण्याचा प्लान अनेकदा रद्द होतो.
New Year Celebration
New Year CelebrationSaam Tv
Published On: 

New Year Celebration : ख्रिसमस व नवीन वर्षाच्या तुमच्या आनंदावर जर कुणी विरजण घालत असेल तर ती आहे वाढलेली महागाई. नवीन वर्षात आपण अशा अनेक ठिकांणाना भेट देण्याचा विचार करत असतो. पण पैशांच्या चिंतेमुळे आपला फिरण्याचा प्लान अनेकदा रद्द होतो.

परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपल्याला प्रवास करता येऊ शकतो. आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगतो जिथे तुम्ही बजेटमध्ये परदेश दौरा पूर्ण करू शकता. बजेटमध्ये परदेशी सहलीची संधी मिळणे यापेक्षा चांगले काय असू शकते. जर तुम्हाला हे ख्रिसमस आणि नवीन वर्ष प्रवास करून साजरे करायचे असेल तर तुम्ही या देशांमध्ये सहलीला जावे.

New Year Celebration
New Year 2023 South India Tour Packages: दक्षिण भारतात नवीन वर्ष साजरे करायचे आहे? मग IRCTC चे स्वस्तातले टूर पॅकेजही जाणून घ्या
sri lanka
sri lanka Canva

मैदानी प्रदेशात वसलेले श्रीलंका हे भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. या देशाचा बहुतांश भाग हिरवाईने वेढलेला आहे. विशेष बाब म्हणजे या देशात भारतीय रुपयाचे मूल्य सुमारे 2 रुपये 69 पैसे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बजेटमध्ये येथे सहलीचा आनंद घेऊ शकता.

vietnam
vietnamCanva

भारतातून (India) व्हिएतनामची सहल सहज करता येते, कारण या देशात एक रुपयाची किंमत 316 व्हिएतनामी डोंग आहे. विशेष म्हणजे या देशात भेट देण्यासाठी अनेक आकर्षक पर्यटनस्थळे आहेत.

Indonesia
IndonesiaCanva

इंडोनेशिया हे भारतीयांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे आणि विशेष म्हणजे येथे जाण्यासाठी व्हिजाची गरज लागत नाही. रिपोर्ट्सनुसार, येथे एका रुपयाची किंमत सुमारे 197 इंडोनेशियन रुपये (Money) आहे. तुम्ही येथे खरेदी आणि मुक्तपणे फिरू शकता.

Cambodia
CambodiaCanva

कंबोडिया या देशातही भारतीय रुपयाचे मूल्य जास्त आहे आणि येथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. रिपोर्ट्सनुसार, येथे एका रुपयात सुमारे 55 रियाल उपलब्ध आहेत. या देशात तुम्ही स्वतःला श्रीमंत समजू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.