

New Year 2023 South India Tour Packages : डिसेंबरमध्ये ख्रिसमसपासून नवीन वर्षाचा उत्सव अवघ्या काही दिवसांपासून सुरू होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने सुरु करण्यासाठी आपण फिरण्याचा प्लान करत आहोत. काहीजण या दिवशी पार्टी किंवा बाहेर जातात. जर तुम्हीही नवीन वर्षात कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतात भेट देण्याचे अनेक पर्याय आहेत.
तसे, हिवाळ्याच्या हंगामात, बहुतेक पर्यटकांना (Travel) एखाद्या डोंगराळ ठिकाणी किंवा बर्फाच्छादित हिल स्टेशनवर जायला आवडते. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात पोहोचतात. पण जर तुम्हाला गर्दीपासून दूर नैसर्गिक सौंदर्य पाहायचे असेल तर तुम्ही दक्षिण भारतातही फिरायला जाऊ शकता.
दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये उत्तम पर्यटन स्थळे आहेत. सुंदर जंगले, समुद्र किनारे, धबधबे, हिरवेगार पर्वत, प्रसिद्ध मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे, हे सर्व तुम्हाला येथे पाहायला मिळेल. नवीन वर्षात IRCTC ने दक्षिण भारताला भेट देण्यासाठी अनेक टूर पॅकेजेस आणले आहेत. येथे तुम्हाला काही टूर पॅकेजची माहिती दिली जात आहे. वेळ आणि बजेटवर आधारित तुमचे सर्वोत्तम IRCTC दक्षिण भारत टूर पॅकेज निवडा.
1. कन्याकुमारीहून तिरुपतीचे दर्शन
तुम्हाला नवीन वर्षाच्या निमित्ताने दक्षिण भारतातील (South India) तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असेल तर IRCTC चे 'South India Divine Ex Rajkot' बुक करा. हे टूर पॅकेज जानेवारीपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग मंदिर, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियल, कन्याकुमारी मंदिर, गांधी मंडपम, कन्याकुमारी बीच, तिरुपती बालाजी मंदिर, पद्मावती मंदिर आणि कालावस्तीला भेट देता येईल.
टूर पॅकेज आठ रात्री आणि नऊ दिवसांचे आहे. टूर पॅकेजची सुविधा, प्रवास केव्हा आणि कुठे सुरू होत आहे आणि IRCTC खर्च याची संपूर्ण माहिती देखील देण्यात आली आहे.
2. सबरीमाला टूर पॅकेजेस
IRCTC केरळमधील सबरीमालाच्या प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन घेता येईल. पर्यटक केरळमधील सबरीमाला श्री धर्मस्थ मंदिराला भेट देऊ शकतात. याशिवाय चोट्टानिकारा देवी मंदिर, वैकोम महादेवाचे मंदिर, एत्तुमनूर महादेवाचे मंदिर आणि इरुमेली मंदिराला भेट देता येईल. हे टूर पॅकेज दोन दिवसांचे आहे. याची संपूर्ण माहिती आपण IRCTC वर पाहू शकतो.
3. केरळ टूर पॅकेजेस
तुम्हाला फक्त केरळमध्येच नैसर्गिक दृश्ये, नारळाची झाडे, समुद्रकिनारा आणि धबधबे इत्यादींच्या मधोमध ट्री हाऊस किंवा बोट हाऊसमध्ये राहण्याचा आनंद मिळू शकतो. शांततेत वेळ घालवण्यासाठी केरळ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही केरळला भेट देण्याचा विचार करत असाल, तर दिल्ली ते केरळ प्रवास, आगमन आणि प्रस्थान ते केरळमधील प्रसिद्ध ठिकाणे, स्थानिक खाद्यपदार्थांची संपूर्ण माहिती गोळा करून तुम्ही भेट देण्याची योजना करू शकता. याची संपूर्ण माहिती आपण IRCTC वर पाहू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.