Petrol Diesel Price Today (23 Aug) : या तीन ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल झाले खूप स्वस्त, तुमच्या शहरांमध्ये किंमत किती?

Petrol Diesel Rate Today : आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली.
Petrol Diesel Price Today 23 Aug
Petrol Diesel Price Today 23 AugSaam TV
Published On: 

Petrol Diesel Rate in Maharashtra (23 August):

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली. त्याचा भारतातील तेलाच्या किमतीवर फारसा परिणाम झालेला नाही. बीपीसीएल, इंडियन ऑइल आणि एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी 22 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज नोएडा आणि लखनऊमध्ये तेलाच्या किमतीत थोडा बदल झाला आहे.

देशभरात पेट्रोल - डिझेलचे दर वाढतच आहेत

महाराष्ट्रात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल 108.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. झारखंडमध्ये पेट्रोलचा (Petrol) दर 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.68 रुपये प्रति लिटरवर आला आहे.

Petrol Diesel Price Today 23 Aug
Petrol Diesel Price Today (22 August): कच्च्या तेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या मुंबईतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

गुजरातमध्ये पेट्रोलचा दर 97.03 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दरही 92.38 रुपये प्रति लिटर झाला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोलचा दर 108.48 रुपये प्रतिलिटर झाला असून डिझेलची किंमत घसरल्यानंतर 93.65 रुपये प्रति लिटरने विकली जात आहे. देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) दर दीर्घकाळ स्थिर आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये बदल -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यात घसरण पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल दोन्ही लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.46 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे आणि ती प्रति बॅरल $80.35 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 0.18 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ते प्रति बॅरल $ 83.88 वर व्यापार करत आहे.

Petrol Diesel Price Today 23 Aug
Petrol Diesel Price Today (21 August): अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घसरण; वाचा महाराष्ट्रातील आजच्या किंमती

कोणत्या शहरांमध्ये बदलले पेट्रोल आणि डिझेलच्या दरात -

• आग्रा- पेट्रोल 45 पैसे (Money) महाग होऊन 96.63 रुपये, डिझेल 44 पैशांनी स्वस्त होऊन 89.80 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

• गुरुग्राम पेट्रोल 33 पैशांनी 96.99 रुपये, डिझेल 89.76 रुपये 17 पैशांनी महागले आहे. • लखनौ- पेट्रोल 17 पैशांनी 96.74 रुपये, डिझेल 89.93 रुपये 17 पैशांनी महागले आहे.

• अहमदाबाद- पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त होऊन 96.42 रुपये, डिझेल 21 पैशांनी स्वस्त होऊन 92.17 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

• अजमेर - पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त होऊन 108.54 रुपये, डिझेल 31 पैसे प्रति लिटर 93.78 रुपये स्वस्त झाले आहे.

नोएडा - पेट्रोल 17 पैसे स्वस्त 96.59 रुपये, डिझेल 17 पैसे स्वस्त 89.76 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. जयपूर- पेट्रोल 7 पैशांनी 108.85 रुपये, डिझेल 93.72 रुपये 7 पैशांनी महागले आहे.

• पाटणा पेट्रोल 7 पैशांनी 107.54 रुपये, डिझेल 94.32 रुपये 7 पैशांनी महागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com