

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होत आहेत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. आज जाहीर झालेल्या दरांमध्ये काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. अनेक शहरांमधील दर घसरले आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. (Latest Petrol Diesel Price Marathi News)
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. कोलकत्तामधील पेट्रोलचे दर १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहेत. चेन्नईत पेट्रोल १०२.६५, डिझेल ९४.२५ रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोलचे दर घसरलेली शहरे
नोएडामध्ये पेट्रोल २७ पैशांनी स्वस्त होऊन ९६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल २६ पैशांनी स्वस्त होऊन ८९.८२ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
उत्तर प्रदेशमधील लखनउमध्ये पेट्रोल आणि डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालं आहे. ९६.४७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ११ पैशांनी स्वस्त होऊन ८९.६६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
प्रयागराजमध्ये पेट्रोल ३८ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.६६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.८६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.
पटणामध्ये १०७.४२ रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल ९४.२१ रुपये प्रति लिटर आहे.
या शहरांमध्ये वाढले दर
गोरखपूरात पेट्रोल ७ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे पेट्रोल ९६.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.९९ रुपये प्रति लिटर आहे.
जयपूरमध्येही पेट्रोल १०८.४५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३.६९ रुपये प्रति लिटरवर पोहचलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.