Petrol Diesel Price Today (1 October) : एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी आज किती पैसे मोजावे लागतील; पुणे-नाशिकसह राज्यातील नवे दर तपासा

Petrol Diesel Rate : देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे, तर काही राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price Today (1 October)
Petrol Diesel Price Today (1 October)Saam Tv
Published On

Petrol Diesel Price :

देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे, तर काही राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी दर पंधरवड्याला पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले जात होते, म्हणजेच दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत होता. तथापि, जून 2017 पासून एक नवीन योजना लागू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलच्या दरांमध्ये सुधारणा केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय (International) बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. सकाळी 6 च्या सुमारास 1 टक्क्यांच्या घसरणीसह WTI क्रूड प्रति बॅरल $ 90.77 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड देखील 1 टक्क्यांनी कमकुवत $ 92.09 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

मात्र, या घसरणीनंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात.

Petrol Diesel Price Today (1 October)
Petrol Diesel Price Today (30 September) : वीकेंडला घराबाहेर पडताय? पेट्रोल- डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai) 

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या भावात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. राज्यातील अनेक भागात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहे.

पुणे

पेट्रोल 106.35 रुपये आणि  डिझेल (Diesel) 92.85 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 106.49 रुपये आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.86 रुपये आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर

नागपुर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.92 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today (1 October)
Petrol-Diesel Price (29th September): मुंबई-पुण्यासह राज्यभरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर; चेक करा सविस्तर

आजचे नवीनतम किमती घरबसल्या सहजपणे जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या शहरातले पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर पहायचे असेल तर तुम्ही एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि त्यांचा शहराचा कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहराचा कोड टाइप करून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com