Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Soan Papdi Recipe in Marathi : सोनपापडी घरच्याघरी कशी बनवायची. याची सोपी आणि सिंपल रेसिपी आज जाणून घेणार आहोत. आम्ही सांगितलेल्या सिंपल टिप्सने तुम्ही ही रेसिपी बनवल्यास सोनपापडी अगदी परफेक्ट तयार होईल.
Soan Papdi Recipe in Marathi
Soan Papdi RecipeSaam TV
Published On

सोनपापडी असा गोड पदार्थ आहे जो घरात प्रत्येक व्यक्तीला आवडतो. सोनपापडीमध्ये अगदी बारीक बारीक रेषा असतात. त्यामुळे सोनपापडी जिभेवर ठेवताच विरघळते. ही स्वीट डिश बनवणे अनेकांना फार कठीण वाटते. मात्र ही अगदी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. यामध्ये फक्त योग्य सामग्री आणि योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊ सिंपल स्टेप्सने सोनपापडी कशी बनवायची.

साहित्य

बेसन पीठ - 2 कप

मैदा - 1 कप

साखर - 1 वाटी

तूप - आवश्यकतेनुसार

Soan Papdi Recipe in Marathi
Ganpati Festival Special Recipe: बाप्पासाठी नैवेद्याला यंदा बनवा फ्रूट्स कोशिंबीर

कृती

सर्वात आधी बेसन पीठ गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर मैदा देखील यात मिक्स करा. आपल्याला हे पीठ फार जास्त भाजायचे नाही. पीठ गरम झाल्यावर एका प्लेटमध्ये ते काढून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडं तूप मिक्स करून घ्या. पीठ थंड होत असताना तुम्ही चाशणी बनवण्यास सुरुवात करू शकता.

चाशणी म्हणजेच पाक बनवण्यासाठी सर्वात आधी एका टोपात पाणी तापण्यासाठी ठेवा. त्यानंतर यामध्ये साखर मिक्स करा. साखरेचा पाक जास्त घट्ट करण्याची आवश्यकता नाही. पाक तयार होताना त्यातील थोडा गोळा खाऊन पाहा. साखरेचा पाक खाताना कुरकुरीत लागायला हवा. असे झाल्यास पाक परफेक्ट तयार झाला असे म्हणता येईल.

आता साखरेचा हा पाक बाहेर काढून घ्या. पाक पूर्ण थंड होण्याची वाट पाहू नका. पाक थंड होण्याआधी त्याचा लांब आकार करून एकावर एक अशा पद्धतीने दोन्ही बाजू जोडून घ्या. पुढे यामध्ये तयार पीठ घ्या. पिठामध्ये साखरेचा पाक मिक्स करत रहा. पाकात पीठ मिक्स करताना मस्त पातळ रेषा तयार होतात. आता तुम्हाला सोनपापडी जितकी पातळ हवी तोपर्यंत पीठ मिक्स करत रहा.

पुढे हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि सेट करा. सोनपापडी तुम्ही तुम्हाला हवी तशी सेट करू शकता. गोल किंवा चौकोनी आकारात तुम्ही सोनपापडी बनवू शकता.

अशा पद्धतीने सोनपापडी बनवल्यास ती अतिशय चविष्ट लागते. तयार सोनपापडी तुम्ही घरी पाहुणे आपल्यावर त्यांना देखील देऊ शकता. तसेच एखाद्या सणा सुद्धा तुम्ही घरी ही सोनपापडी बनवू शकता.

Soan Papdi Recipe in Marathi
Kokan Style Amboli Recipe : नाश्त्याला करा 'हा' खास बेत, येईल कोकणाची आठवण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com