Shreya Maskar
बिस्किटांचा गुलाबजाम बनवण्यासाठी बिस्कीट, तूप, दूध, साखर, पाणी, वेलची पाडवर , सुकामेवा इत्यादी साहित्य लागते.
बिस्किटांपासून गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आवडत्या बिस्किटांचा चुरा करून घ्या.
बिस्किट बारीक करण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता.
बिस्किटांच्या बारीक चुऱ्यामध्ये दूध आणि ड्रायफ्रुटची पावडर घालून पीठ छान मळून घ्या.
बिस्किटांची कणीक मऊ होण्यासाठी त्यात तूप घाला.
कणकेचे छोटे गोळे करून गरम तूपामध्ये गोल्डन फ्राय करा.
आता दुसरीकडे गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून मंद आचेवर उकळावे.
साखर छान विरघळल्यानंतर त्यात वेलची पाडवर घाला आणि मिक्स करा.
तळलेले गुलाबजाम साखरेच्या पाकात घालून छान घोळवा.
अशाप्रकारे मावा, मैदा न वापरता बिस्किटांपासून झटपट गुलाबजाम बनवा.