Shreya Maskar
कोकणात बनवतात तसे कुळथाचे पिठले घरी १५ मिनिटांत बनवा.
खमंग कुळथाचे पिठले बनवण्यासाठी कुळथ, कांदा, लसूण, कोकम, कोथिंबीर, पाणी, तेल इत्यादी साहित्य लागते.
तसेच काळीमिरी पूड, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, हिंग इत्यादी मसाले लागतात.
कुळथाचे पिठले बनवण्यासाठी सर्वप्रथम कुळथ वाटून त्याचे पीठ तयार करून घ्या.
कुळथाच्या पिठामध्ये काळीमिरी पूड, हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी घालून छान बॅटर बनवून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी तयार करा.
फोडणी छान तडतडू लागल्यावर त्यात कुळीथ पिठाचे बॅटर घाला आणि छान मिक्स करून घ्या.
गॅस मंद आचेवर ठेवून जोवर कुळथाची पिठी घट्ट होत नाही तोवर ढवळत रहा.
कुळथाची पिठीची चव वाढवण्यासाठी त्यात कोकम घाला.
पाच मिनिटे कुळथाची पिठी मंद आचेवर शिजवून घ्या. अशाप्रकारे कोकणी स्टाईलमध्ये कुळथाची पिठी तयार झाली.
कुळथाची पिठी गरमागरम भाकरीसोबत सव्र्ह करताना वरून कोथिंबीर भुरभुरवा.
NEXT : ज्वारीच्या भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर; फायदे वाचून व्हाल थक्क