Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला कोकणाच्या पारंपारिक पद्धतीने आंबोळी तयार करा.
मऊ, लुसलुशीत आंबोळी करण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
कोकण स्टाइल आंबोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे पाच ते चार तास पाण्यात भिजवून ठेवा.
या मिश्रणात पाच तासानंतर भिजवलेले पोहे घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्या.
आता हे मिश्रण रात्रभर झाकून सामान्य तापमानावर ठेवून द्या. यामुळे पीठ छान आंबण्यास मदत होईल.
सकाळी या पिठामध्ये थोडे पाणी आणि मीठ घालून मिक्स करून घ्या.
एक पॅन गरम करून त्यात थोडे तेल टाका.
आता या पॅनवर आंबोळी पीठ छान गोलाकार पसरवून घ्या.
तीन ते चार मिनिटे झाकण लावून शिजवून घ्यावे. अशाप्रकारे कोकणी स्टाइल आंबोळी तयार झाली.