Passport: आता घरबसल्या मिळणार पासपोर्ट तोही फक्त १५०० रूपयांत, 'असा' करा अर्ज

Passport Online Apply: आता घरी बसून स्वस्तात पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज कसा करायचा, ते आपण सविस्तर जाणून घेवू या.
Passport Online Apply
Passport Online ApplySaam Tv
Published On

How To Apply For Passport

तुम्हाला देखील आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे का? किंवा तुम्हाला काही कामासाठी किंवा अभ्यासासाठी परदेशात जायचं असेल, तर त्यासाठी पासपोर्ट खूप महत्वाचा आहे. परंतु पासपोर्ट (Passport) बनवणं हे खूप जिकरीचं काम आहे. तो बनवताना अगदी नाकीनऊ येतात. पण हेच टेन्शन आता मिटणार आहे. (Latest Marathi News)

तुम्हाला आता घरबसल्या आरामात त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तोही अगदी स्वस्तात हा पोसपोर्ट बनवून मिळणार आहे. हे काम करण्यासाठी एजंट चार ते पाच हजार रुपये घेत असल्याचं अनेकदा दिसून येते. तर पासपोर्टसाठी (Passport) अर्ज करण्याची फी फक्त 1500 रुपये आहे. आता तुम्हाला पैसे वाचविता येणार आहेत. आता आपण पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा, ते जाणून घेवू या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज 'या' पद्धतीने करा

यासाठी सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसवर पासपोर्ट सेवा केंद्राचे पोर्टल उघडा. येथे तुम्हाला 'नवीन वापरकर्ता नोंदणी' वर क्लिक करावे लागेल आणि जेव्हा तुम्ही तपशील भराल तेव्हा नोंदणीवर टॅप करा. यानंतर तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्ससह पुन्हा लॉगिन करा. येथे तुम्हाला Apply for Fresh Passport/Re-issue of Passport ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा. त्यानंतर, अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी सेव्ह केलेले/सबमिट केलेले अॅप्लिकेशन्स स्क्रीनवर पेमेंट करा.

यानंतर शेड्यूल अपॉइंटमेंटच्या पर्यायावर क्लिक करा. येथून प्रिंट अॅप्लिकेशन रिसीप्टवर क्लिक करा आणि तुमच्या अर्ज केलेल्या पावतीची प्रिंट घ्या. यामध्ये अप्लाइड रेफरन्स नंबर (ARN) आणि अपॉइंटमेंट नंबर असेल. हे केल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे अपॉइंटमेंट मिळेल.त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट (Passport) सेवा केंद्रात जावे लागेल जिथे तुम्हाला प्रत्यक्ष पडताळणीसाठी बोलावले जाईल. जाताना पडताळणीसाठी तुमची मूळ कागदपत्रे सोबत घ्या.

Passport Online Apply
White Passport: सामान्य माणसांना नसतो पांढऱ्या रंगाचं पासपोर्ट वापरण्याचा अधिकार,कारण...

'या' पद्धतींद्वारे करा पेमेंट

सर्व PSK/POPSK/PO वर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी, तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि SBI बँक चालानद्वारे पेमेंट करू शकता.

'ही' कागदपत्रे आहेत आवश्यक

यासाठी (Passport) आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म प्रमाणपत्र, मतदारांचे फोटो ओळखपत्र, बँकेचे पासबुक फोटो, दहावीचे मार्कशीट हे आवश्यक कागदपत्रे आहेत.

Passport Online Apply
Indian Passport: भारतीय नागरिक व्हिसाशिवाय जगातील या 62 देशांना देऊ शकता भेट, पाहा संपूर्ण लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com