

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर चवळी आहारात का समाविष्ट करावी? चवळीतील प्रोटीन आणि फायबर पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करू शकतात. वजन व्यवस्थापनासाठी चवळीचे संभाव्य फायदे आणि तिचे पोषणमूल्य सोप्या भाषेत जाणून घ्या.
मुलाला कॅन्सर असल्याचं समोर आलं की, आई-वडिलांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. मात्र आजाराची सुरुवातीच्या टप्प्यातच ओळख झाली तर उपचार लवकर सुरू करता येतात. त्यामुळे मुलाच्या शरीरात होणारे छोटे-मोठे बदलही दुर्लक्षित करू नयेत.
मोठ्या व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरच्या तुलनेत मुलांमधील कॅन्सरची लक्षणं अनेकदा सामान्य आजारांसारखी दिसतात. सर्दी, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळेही अशीच काही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे पालक, शिक्षक आणि कुटुंबातील इतरांनी मुलांच्या आरोग्यात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
सतत ताप येणं, अचानक वजन कमी होणं, शरीरावर सहज निळे डाग पडणं, शरीरावर गाठ येणं, डोळ्यांमध्ये वेगळी चमक दिसणं, डोकेदुखी किंवा उलट्या होणं अशी काही लक्षणं सुरुवातीचे इशारे असू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), मुलांमधील कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास उपचारानंतर मुलाच्या बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मात्र, सुरुवातीची अनेक लक्षणं सामान्य आजारांसारखी असल्याने ती ओळखणं महत्त्वाचं ठरतं.
मुलाला वारंवार किंवा सतत ताप येत असेल आणि त्यामागे स्पष्ट कारण दिसत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. काही वेळा कॅन्सरच्या पेशी अस्थिमज्जेत म्हणजेच बोन मॅरोमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील सामान्य रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे ताप वारंवार येऊ शकतो.
मुलाच्या शरीरावर अचानक गाठ आली आणि ती दुखत नसेल, तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा लसिका ग्रंथींमध्ये म्हणजेच लिम्फ नोड्समध्ये कॅन्सरच्या पेशी जमा झाल्यामुळे गाठ येऊ शकते. ही गाठ दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली आणि त्यासोबत ताप किंवा वजन कमी होण्यासारखी लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
मुलाला हाडं किंवा सांधे वारंवार दुखत असतील, तर त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. हाडांशी संबंधित काही कॅन्सर 10 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये, विशेषतः किशोरवयात, दिसू शकतात. या वयात मुलांची हाडं वेगाने वाढत असतात. अशा काही आजारांमध्ये कॅन्सरच्या पेशी हाडांच्या आत वेगाने वाढू लागतात. त्यामुळे हाडं आतून कमकुवत होऊ शकतात आणि वेदना जाणवू शकतात.
मुलगा व्यवस्थित खात असूनही त्याचं वजन वाढण्याऐवजी कमी होत असेल, तर हे दुर्लक्षित करू नका. अचानक वजन कमी होणं आणि सतत थकवा जाणवणं ही देखील काही गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात. कॅन्सरच्या पेशींना वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रोटीनची गरज असते. त्यामुळे मुलाने अन्नातून घेतलेल्या कॅलरी आणि प्रथिनांचा मोठा भाग या पेशी वापरू शकतात.
मुलाला अगदी किरकोळ कारणाने शरीरावर निळे डाग पडत असतील, नाकातून वारंवार रक्त येत असेल किंवा रक्तस्राव सहज थांबत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्ताचा कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया किंवा इतर काही गंभीर आजारांमध्ये अशी लक्षणं दिसू शकतात. काही वेळा कॅन्सरच्या पेशी अस्थिमज्जेत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शरीरात निरोगी प्लेटलेट्स तयार होण्याचं प्रमाण कमी होतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.