Optical illusion : डोक्याला द्या ताण, या चित्रात तुम्हाला नेमके काय दिसतेय पक्षी की,व्यक्ती?

या ऑप्टिकल इल्युजनमध्ये जे आपल्याला दिसते ते तसेच नसते.
Optical Illusion Bird or Man Image
Optical Illusion Bird or Man ImageViral optical illusion
Published On: 

Optical illusion art : आपल्या डोळ्यांना वास्तविक नसलेली एखादी गोष्ट जाणवते आणि मेंदू आपली बुद्धिमत्ता वापरून त्यातून दुसरे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ऑप्टिकल भ्रम निर्माण होतात.

हे देखील पहा -

या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये जे आपल्याला दिसते ते तसेच नसते. हा ऑप्टिकल इल्युजन आर्टचा प्रभाव आहे ज्यामुळे इंटरनेटवर सतत चर्चेचा विषय ठरला आहे.

आपण पाहात असलेल्या चित्राला बारकाईने आणि काही काळ पाहिल्यास लक्षात येईल की हा कुणाचा हात आहे, पक्ष्याचा नाही. अनेक युजर्सनी हे चित्र पाहिल्यावर कमेंट केल्या. त्यातला एक म्हणाला, "मला तिकडे हातही दिसला नाही. हे कसं शक्य आहे ?

हे चित्र तयार करणाऱ्या चित्रकाराचे आपण कौतुक करायला हवे. ही प्रतिमा पाहताना आपण बरेच वेळा आपल्या डोळ्यांना दोष देतो परंतु, निरखून पाहिल्यास आपल्याला कळेल ऑप्टिकल इल्युजन इमेज वळलेल्या चोचीसह गरुड असल्याचे दिसते. ते गरुडासारखे दिसते अशा प्रकारे हाताने पेंट केले आहे. चोचीचा खालचा भाग म्हणजे व्यक्तीच्या हाताचा अंगठा.

२. मोठ्या चोचीचा पक्षी (Birds) : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना समुद्र पक्ष्याविषयी माहिती असेल. हे पक्षी दरवर्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रवास करतात. मात्र झाडावर दिसणारा हा पक्षी हा हॉर्नबिल नसून पक्ष्याच्या आकारात रंगवलेला हात आहे.

३. या चित्रात (Photo) आपल्याला पोपट दिसला असेल. गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. कलाकाराने उत्तम काम केले आहे आणि मॉडेलनेही. तुम्हाला अजूनही हा पक्षी वाटतो का? तुम्ही हे चित्र झूम करुन पहा. तुम्हाला नक्कीच त्यात व्यक्ती दिसेल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.