OnePlus Diwali Sale सुरू, Flagship Smartphones स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळत आहे भरघोस सूट

OnePlus Diwali Sale सुरू, Flagship Smartphones स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळत आहे भरघोस सूट
OnePlus Diwali Sale
OnePlus Diwali SaleSaam Tv
Published On

OnePlus Diwali Sale:

जर तुम्ही OnePlus स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. दिवाळीच्या निमित्ताने कंपनी अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आणि नॉर्ड स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देणार आहे. OnePlus च्या कोणत्या स्मार्टफोन्सवर किती सवलत मिळणार आहे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

OnePlus Flagship Smartphones वर काय आहे ऑफर?

OnePlus Open खरेदी करणारे ग्राहक 5000 रुपयांची बँक सवलत मिळवू शकतात आणि 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील घेऊ शकतात. ग्राहकांना डिव्हाइस खरेदी करताना निवडक डिव्हाइस एक्सचेंजेसवर 5000 रुपयांची अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OnePlus Diwali Sale
iPhone, Samsung, Motorola सर्व स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त सूट, उद्यापासून Flipkart Diwali Sale सुरू

OnePlus 11 5G आणि OnePlus Marble Odyssey खरेदी करणारे ग्राहक 3000 रुपयांची बँक सवलत आणि 4000 रुपयांचे विशेष कूपन मिळवू शकतात.

OnePlus 11 5G खरेदी करणारे ग्राहक 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्यायाचा लाभ घेऊ शकतात, तर OnePlus 11 5G Marble Odyssey खरेदी करणारे ग्राहक 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. (Latest Marathi News)

OnePlus 11R 5G आणि OnePlus 11R 5G सोलर रेड स्पेशल एडिशन खरेदी करणारे सर्व ग्राहक 2000 रुपयांची इन्स्टंट बँक सवलत मिळवू शकतात. हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर ग्राहक 9 महिन्यांपर्यंत नो-कोस्ट EMI घेऊ शकतात.

OnePlus 10 Pro 5G आणि OnePlus 10T 5G खरेदी करणार्‍या ग्राहकांना अनुक्रमे 5000 ची बँक सवलत, 14,000 आणि 10,000 रुपयांचे विशेष कूपन मिळू शकतात. ग्राहक 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय घेऊ शकतात.

OnePlus Diwali Sale
4K Ultra HD TV: अर्ध्या किमतीत 55 इंचाचा 4K UHD Smart TV खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

OnePlus 10R 5G खरेदी करणारे ग्राहक 3000 इन्स्टंट बँक सवलत आणि 7000 रुपयांचे विशेष कूपन घेऊ शकतात. ग्राहक 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतात.

ICICI बँक आणि OneCard ग्राहक नमूद केलेल्या बँक ऑफरचा लाभ Amazon, OnePlus Experience Stores, OnePlus.in आणि ऑफलाइन भागीदार स्टोअरवर घेऊ शकतात.

OnePlus Nord Smartphones

OnePlus Nord 3 5G खरेदी करणारे ग्राहक 3,000 रुपयांच्या विशेष कूपन सवलतीसह 3,000 रुपये इन्स्टंट बँक सवलत मिळवू शकतात. ग्राहकांना OnePlus Nord 3 साठी 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI देखील मिळू शकते.

OnePlus Nord CE 3 खरेदी करणार्‍या ग्राहकांना 2,000 रुपयांची बँक सवलत आणि 2,500 रुपयांपर्यंतच्या विशेष कूपन सूट मिळू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com