Belly fat: पोटाच्या कोणत्या भागावर चरबी साचतेय? तज्ज्ञांनी सांगितलं कोणत्या गंभीर आजारांचा असू शकतो हा मोठा इशारा

Abdominal fat: पोटाच्या कोणत्या भागावर चरबी साचते किंवा पोट फुगलेले दिसते यावरून जीवनशैली, ताणतणाव, जास्त खाणे किंवा इतर आरोग्य समस्यांबाबत संकेत मिळू शकतात. खालचे पोट, वरचे पोट आणि सतत फुगलेले पोट यातील फरक आणि डॉक्टरांचे महत्त्वाचे सल्ले जाणून घ्या.
Belly fat
Belly fatsaam tv
Published On

आजकालची धावपळीची जीवनशैली, अनियमित खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. अगदी कमी वयातही अनेक जणांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यातही गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय असल्यास शरीरावर अतिरिक्त चरबी साचू लागते. त्यामुळे पोटावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वाढणाऱ्या चरबीकडे दुर्लक्ष करू नका. कारण ती केवळ वजन वाढल्याचं लक्षण नसून काही आरोग्य समस्यांचाही इशारा असू शकते.

डॉक्टरांच्या मते, पोटाच्या कोणत्या भागावर चरबी साचते यावरून त्यामागचं संभाव्य कारण समजू शकतं. त्यामुळे वेळेत ही लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे.

Belly fat
High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

शरीरावर कुठे चरबी साचते यावरून आरोग्याचा अंदाज येऊ शकतो, मात्र केवळ त्यावरून कोणताही आजार निश्चित करता येत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण ठेवणं हे निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर वजन झपाट्याने वाढत असेल, पोटाची चरबी कमी होत नसेल किंवा त्यासोबत इतर त्रासही जाणवत असतील, तर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घेणं गरजेचं आहे.

पोटाच्या खालच्या भागावर चरबी असेल तर...

जर पोटाच्या खालच्या भागावर जास्त चरबी साचलेली दिसत असेल तर त्यामागे फक्त जास्त खाणं हेच कारण असेल असं नाही. सततचा ताण, मानसिक चिंता किंवा नैराश्य (डिप्रेशन) याचाही त्यामागे मोठा वाटा असू शकतो. अनेकदा तणावाखाली असलेली व्यक्ती नकळत जास्त खात राहते आणि त्यामुळे वजन वाढू लागते.

Belly fat
Monsoon Health: पावसाळ्यात संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला जास्त? डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांसाठी दिला महत्त्वाचा इशारा

पोटाच्या वरच्या भागावर चरबी वाढत असेल तर...

पोटाच्या वरच्या भागावर किंवा शरीराच्या वरच्या भागात चरबी वाढत असेल तर ते गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं जात असल्याचं लक्षण असू शकतं. विशेषतः गोड पदार्थ वारंवार खाण्याची सवय असल्यास या भागात चरबी साचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे.

पोट फुगलेलं किंवा सुजल्यासारखं दिसत असेल तर...

काही वेळा पोटावर चरबी नसतानाही पोट फुगल्यासारखं किंवा सुजल्यासारखं दिसू शकतं. यामागे मद्यपानाची सवय किंवा घाईघाईने जेवण्याची सवय कारणीभूत असू शकते. मात्र अशा प्रकारे पोट सतत फुगलेलं दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा हे एखाद्या गंभीर आजाराचं सुरुवातीचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com