GPay, PhonePe आणि Paytm वरुन Transaction होणार लवकरच बंद, लगेच करा हे काम; अन्यथा...

UPI ID Block : नवीन वर्षापासून GPay, PhonePe आणि Paytm वरुन ट्रांजेक्शन करता येणार नाही. लवकरच थर्ड पार्टी पेमेंट अॅप्स बंद होणार आहे. न वापरलेल्या आयडीवरुन १ जानेवारी २०२४ नंतर कोणतेही ट्रांजेक्शन करता येणार नाही.
UPI ID Block
UPI ID BlockSaam Tv
Published On

NPCI Deactivate UPI ID :

डिजीटलायझेशनच्या युगात फोनवरून ट्रांजेक्शन करणे हल्ली सोपे होत आहे. परंतु, नवीन वर्षापासून GPay, PhonePe आणि PayTM वरुन ट्रांजेक्शन करता येणार नाही. लवकरच थर्ड पार्टी पेमेंट अॅप्स बंद होणार आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने बँका (Bank) आणि थर्ड पार्टी अॅप्सला नोटीस बजावली आहे. UPI ID वरुन मागच्या वर्षभरात एकदाही ट्रांजेक्शन न करणाऱ्या व्यक्तीचे खाते रद्द करण्यात येणार आहे.

जर तुम्ही मागील वर्षभरात एकदाही UPI ID वरुन व्यवहार केला नसेल तर ३१ डिसेंबरला तुमचा ID ब्लॉक करण्यात येईल. याचा अर्थ न वापरलेल्या आयडीवरुन १ जानेवारी २०२४ नंतर कोणतेही ट्रांजेक्शन करता येणार नाही.

UPI ID Block
Upcoming Smartphone in January 2024: जानेवारी महिन्यात लॉन्च होणार जबरदस्त फोन, फीचर्सही मिळतील कमाल

1. याचा परिणाम कसा होईल?

Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाइन पेमेंट करतात. यामध्ये UPI आयडी चा समावेश केला जातो. जो आपल्या मोबाइल क्रमांकाशी जोडला जातो. बरेचदा हा मोबाइल नंबर अनेक UPI ID शी जोडला जातो. ज्याचा वापर अधिक वेळा केला जात नाही.

2. कसा कराल आयडी ब्लॉक?

जर तुम्हाला जुना UPI ID बंद करायचा नसेल तर तुम्हाला ३१ डिसेंबरच्या आधी त्याला पुन्हा सुरु करावा लागेल. यासाठी तुम्हाला त्या आयडीवरुन काही ट्रांजेक्शन करावे लागेल.

UPI ID Block
Deepfake ची भीती वाटतेय? तुमच्यासोबतही असे घडले तर काय कराल?

3. जुना UPI ID का बंद केला जात आहे?

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार युजर्स आपला जुना UPI ID लॉग आउट न करता नवीन फोनमध्ये लॉन इन करतात. ज्यामध्ये आपला मोबाइल नंबर लिंक असतो. यामुळे फोनसोबतच वैयक्तिक डेटा हॅक होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com