Deepfake ची भीती वाटतेय? तुमच्यासोबतही असे घडले तर काय कराल?

Deepfake Video Viral News : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या डीपफेक व्हिडीओचे शिकार झाला तर... अशावेळी काय कराल? व्हिडीओ डीप फेक आहे का? कसे ओळखाल? जाणून घेऊया.
Deepfake Video
Deepfake VideoSaam tv
Published On

Deepfake Video Identify :

मागच्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडिओ व्हायरल अशा घटना वारंवार समोर येत आहे. याचा सगळ्यात जास्त त्रास बॉलिवूड कलाकरांना झालेला पाहयाल मिळाला. यामध्ये रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, काजोल आणि आलिया भट्ट नंतर प्रियांका चोप्रा डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात येतो. याबाबत केंद्र सरकराने सोशल मीडिय प्लॅटफॉर्मला निर्देश दिले आहेत. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या डीपफेक व्हिडीओचे शिकार झाला तर... अशावेळी काय कराल? व्हिडीओ डीप फेक आहे का? कसे ओळखाल? जाणून घेऊया.

1. व्हिडीओ डीप फेक कसा ओळखाल?

Cyber Dost या X हॅन्डलवरुन डीपफेक व्हिडिओबाबत (Video) माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडीओ ओळखताना त्वचेकडे (Skin) लक्ष द्या. यामध्ये गाल आणि कपाळावर सुरकुत्या दिसतात. त्याला निरखून पाहाण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट सावली आणि प्रतिबिंबांकडे लक्ष द्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग दिसत नाही ना याची खात्री करा.

डीपफेक व्हिडीओ ओळखताना तिसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव तपासा, व्हिडीओ नॅचरल दिसत आहे का ते देखील तपासा. व्हिडीओमध्ये डोळे मिचकवताना दिसताय का देखील पाहा. ओठांची हालचाल, आवाज देखील तपासा असे दिसल्यास हा व्हिडीओ फेक आहे हे समजेल.

2. सायबर क्राईम हेल्पलाइन

सायबर क्राईमसोबत (Cyber Crime) कोणतीही घटना तुमच्यासोबत घडल्यास त्वरीत हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करुन तक्रार नोंदवा. तसेच https://cybercrime.gov.in/ ला भेट देऊन घरी बसून ऑनलाइन तक्रार नोंदवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com