
कॅन्सर म्हटलं की, आपल्या पायाखलाची जमीन सरकते. तज्ज्ञ म्हणतात की, कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून त्यावर उपचार केले तर ते फायद्याचं असतं. असंच जर तुम्हाला कॅन्सर होण्याच्या ३ वर्षांपूर्वी समजलं तर.... जर तुम्हाला तीन वर्षे आधीच कळले की तुमच्या शरीरात एक गंभीर आजार होणार आहे, तर तुम्ही तो वेळेत थांबवू शकणार नाही का?
आजच्या काळात कॅन्सर हा एक प्राणघातक आजार मानला जातो. त्यामुळ लवकर निदान हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. त्याच दरम्यान एका नवीन संशोधनामुळे आशेचा एक मोठा किरण जागृत झाला आहे.
संशोधकांच्या एका ग्रुपने असा फॉर्म्युला शोधून काढला आहे की जो कॅन्सर सुरू होण्याच्या तीन वर्षांपूर्वी त्याचे संकेत देऊ शकतो. याचाच अर्थ ज्यावेळी हा आजार शरीरात पूर्णपणे विकसित झालेला नसतो तेव्हा त्याची लक्षणं शोधता येतात.
केंब्रिजच्या शास्त्रज्ञांनी काही बायोमार्कर्सना समजून घेतलं आहे जे कॅन्सर होण्याच्या अनेक वर्षांपूर्वी शरीरात दिसू लागतात. ही चिन्हं शरीराच्या आत होत असलेल्या बदलांना सूचित करतात. जे सामान्य पेशींचं कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत.
या संशोधनात रक्ताचे नमुने आणि जीनोमिक डेटाच्या मदतीने शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, कॅन्सर होण्याच्या तीन वर्षांपूर्वी शरीरात काही प्रोटीन आणि अनुवांशिक बदल एक्टिव्ह होतात. या बायोमार्कर्सचा मागोवा घेण्यासाठी एक विशेष टेस्ट विकसित केली जातेय. ही टेस्ट रक्त चाचणीद्वारे कार्य करणार आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात ही चाचणी नियमित आरोग्य तपासणीचा भाग बनू शकते.
फुफ्फुसांचा कॅन्सर
यकृताचा कॅन्सर
आतड्यांचा कॅन्सर
स्तनाचा कॅन्सर
लवकर निदान- यामुळे वेळेत निदान होणार असून कॅन्सरवर वेळेत उपचार करता येऊ शकतात.
खर्चात कपात- लवकर उपचार कमी खर्चिक आणि अधिक प्रभावी असतात.
मृत्यूदरात घट होणं- या पद्धतीमुळे मृत्युदरात मोठी घट शक्य आहे
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.