World Brain Tumor Day: ब्रेन ट्यूमर झाल्यास शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत; वेळीच उपचारांची माहिती घ्या

World Brain Tumor Day 2025: आज ब्रेन ट्यूमर डे असून या दिवशी या समस्येबाबत जनजागृती केली जाते. आज आपण या दिवसाच्या निमित्ताने ब्रेन ट्यूमरची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया.
World Brain Tumor Day 2025
World Brain Tumor Day 2025saam tv
Published On

दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून मानला जातो. या दिवसाचा उद्देश ब्रेन ट्यूमरबद्दल जागृकता निर्माण करणे हा आहे. ब्रेन ट्यूमर हा तरुण असो वा वृद्ध, कोणालाही होऊ शकतो आणि यशस्वी उपचारांमध्ये वेळीच निदान होणे ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. तरीही, अनेक लोकांना अजूनही याची लक्षणे माहित नाहीत. जागतिक ब्रेन ट्यूमर दिन हा या आजाराविषयी योग्य माहिती पसरवण्यास, सामान्य गैरसमज दूर करण्यास आणि रुग्णांना, कुटुंबांना आणि ब्रेन ट्युमरशी लढण्यासाठी पाठिंबा देण्यास मदत करतो.

नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील न्यूरोसर्जन डॉ. हरीश आर. नाईक यांनी सांगितलं की, भारतात ब्रेन ट्यूमरच्या वाढत्या प्रसाराकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लोकांना ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांची माहिती नसते आणि त्यामुळे ते या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांना त्वरित उपचार घेण्यापासून रोखते. मेंदूत किंवा त्याच्या आजूबाजूला असामान्य पेशी वाढतात तेव्हा ब्रेन ट्यूमर होतो.

World Brain Tumor Day 2025
Brain Tumor Early Symptoms : ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात दिसतात हे 6 मोठे बदल; लक्षण ओखळून लगेच डॉक्टरकडे जा

काही ट्यूमर मेंदूमध्ये सुरू होतात तर काही शरीराच्या इतर भागांमध्ये होणाऱ्या कर्करोगापासून पसरतात. काही ट्यूमर हळूहळू वाढतात आणि ते कर्करोगजन्य नसतात, तर काही जलद गतीने वाढतात आणि कर्करोगजन्य असतात. ब्रेन ट्यूमरचं नेमकं कारण अस्पष्ट आहे, परंतु अनुवांशिकता, उच्च पातळीच्या रेडिएशनच्या संपर्कात येणे आणि कौटुंबिक इतिहासामुळे धोका वाढू शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, ट्यूमर कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय विकसित होतात, असंही डॉ. हरीश नाईक यांनी सांगितलंय.

ब्रेन ट्यूमरची लक्षणं कोणती?

ब्रेन ट्यूमरची लक्षणे ही ट्यूमरचा आकार, स्थान व्यक्तीनुसार बदलतात. सामान्य लक्षणांमध्ये वारंवार डोकेदुखी, दृष्टी समस्या, स्मरणशक्ती कमी होणे, व्यक्तिमत्त्वात बदल आणि आकडी येणे यांचा समावेश आहे. ही लक्षणे इतर आरोग्य समस्यांसारखी दिसू शकतात, परंतु जर ती कायम राहिली तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्यानंतर वेळीच उपचार घ्या. उपचारांना उशीर केल्यास तुमची स्थिती आणखी बिघडू शकते.

World Brain Tumor Day 2025
Oral Cancer Causes Non-Tobacco : तंबाखूशिवाय ही आहेत तोंडाचा कॅन्सर होण्याची प्रमुख 4 कारणं; तुम्हीही या चुका करता नाही ना!

ट्यूमरच्या प्रकारावर, त्याच्या आकारावर आणि स्थानावर उपचार अवलंबून असतात. उपचार पर्यायांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी सारख्या नवीन उपचार पर्यायांचा समावेश आहे. इमेज-गाइडेड सर्जरी, प्रोटॉन थेरपी आणि लिक्विड बायोप्सी यासारख्या अलिकडच्या प्रगत उपचारामुळे डॉक्टरांना ट्यूमरवर उपचार करण्यास मदत होत आहे आणि ते सुरक्षित आणि अचूक आहेत आणि यशस्वी परिणाम देतात.

World Brain Tumor Day 2025
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

ब्रेन ट्यूमर रोखता येते का?

ब्रेन ट्यूमर रोखण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु हानिकारक रसायनं आणि अनावश्यक रेडिएशनचा संपर्क कमी केल्यास मदत होऊ शकते. शिवाय निरोगी जीवनशैली बाळगणे आणि कौटुंबिक इतिहास असल्यास वेळोवेळी वैद्यकिय सल्ला घेणे रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं. आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा आणि लक्षणं आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com