Microwave Food Safety Tips: मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही हे पदार्थ गरम करू नका, आरोग्यासाठी ठरतात धोकादायक

Health risks of reheating rice in microwave: मायक्रोवेव्हमध्ये काही पदार्थ पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. उकडलेली अंडी, भात, हिरव्या भाज्या आणि प्रोसेस्ड मीट गरम करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणते धोके संभवतात ते जाणून घ्या.
Microwave Food Safety Tips
Microwave Food Safety TipsSAAM TV
Published On

आजकाल जवळजवळ प्रत्येक किचनमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन असतो. सध्या हे खूप उपयुक्त उपकरण मानलं जातं. सकाळी लवकर नाश्ता बनवणं असो, उरलेलं अन्न गरम करणं असो किंवा झटपट स्वयंपाक करणं असो, मायक्रोवेव्ह प्रत्येक कामात मदत करतो.

पण तुम्हाला माहित आहे का की, मायक्रोवेव्हमध्ये प्रत्येक गोष्ट गरम करणं सुरक्षित नाहीये? अनेकदा लोक विचार न करता अन्न मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात. ज्यामुळे चव, पोषण आणि कधीकधी आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. असे काही खाद्यपदार्थ आहेत जे मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं टाळलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया की, कोणत्या गोष्टी चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत.

थंड उकडलेली अंडी

बरेच लोक उरलेली उकडलेली अंडी मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करतात, पण हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मायक्रोवेव्हमध्ये अंड्याच्या आत वाफ जमा होते, ज्यामुळे ते फुटू शकतं. अंड्याचा पोत आणि चव यावरही परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला अंडं पुन्हा गरम करायचं असेल तर ते कापून उघडून मंद आचेवर हळूहळू गरम करा.

Microwave Food Safety Tips
Diabetic Kidney Problems: मधुमेही रूग्णांमध्ये ही ३ प्रमुख लक्षणं दिसली तर व्हा सावध; किडनी निकामी होण्याचा धोका

रात्रीचा उरलेला भात

भात वारंवार पुन्हा गरम करणं धोकादायक असू शकतं. जास्त वेळ बाहेर ठेवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. मायक्रोवेव्ह प्रत्येक भागाला समान रीतीने गरम करत नाही त्यामुळे काही बॅक्टेरिया जिवंत राहू शकतात. त्यामुळे भात व्यवस्थित पूर्णपणे शिजवून एकदाच खा.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्या मायक्रोवेव्हमध्ये वारंवार पुन्हा गरम करणं योग्य नाही. त्यामध्ये असलेले नायट्रेट्स गरम झाल्यावर ते शरीरासाठी हानिकारक असतात. वारंवार गरम केल्याने भाज्यांची चव खराब होऊ शकते.

Microwave Food Safety Tips
Vastu Tips: जेवणासाठी ताटात ३ पोळ्या वाढताय तर थांबा; अन्नासंबंधीचे वास्तू नियम जाणून घ्या

हिरव्या आणि लाल मिरच्या

मायक्रोवेव्हमध्ये मिरच्या गरम करताना काळजी घ्या. त्यामध्ये असलेले कॅप्सायसिन हवेत पसरून डोळ्यांना आणि घशाला त्रास होऊ शकतो. मायक्रोवेव्ह उघडल्यावर धुरासारखा तीव्र परिणाम जाणवू शकतो. मायक्रोवेव्हमध्ये मिरच्या गरम करणं टाळा.

Microwave Food Safety Tips
White hair facts: एक ग्रे हेअर उपटला की अनेक केस पांढरे होतात? जाणून घ्या सायन्स काय सांगतं

प्रोसेस्ड मीट

सॉसेज, सलामी आणि इतर प्रक्रिया केलेलं मांस मायक्रोवेव्ह करणं हानिकारक असू शकतं. उच्च तापमानामुळे त्यातील प्रिझर्व्हेटिव्ह आणि चरबीमध्ये बदल होऊन हानिकारक पदार्थ तयार होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com