नवरात्रीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात अनेक लोकांचे उपवास असतात. दिवसातून फक्त एक वेळेस जेवायचे. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हालाबी कंटाळा आला असेल आणि शरीराला पोषक आहार मिळावा असे वाटत असेल तर ही रेसिपी ट्राय करा
उपवास आणि पोषक तत्व असलेले पदार्थ सर्वांनाच खायला आवडतील. उपवासात एका वेळेच्या जेवणात तुम्ही बटाटाच्या गोडाचा शिरा खाउ शकतात. पोटाला आराम मिळण्यासाठी मऊ, लुसलुशीत बटाटाच्या शिरा कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वप्रथम बटाटे उकडून त्यांना व्यवस्थित मॅश करा.
त्यानंतर एका पॅनमध्ये गरम तूपात मॅश केलेले बटाटे परतून घ्या.
मध्यम गॅसवर बटाटे शिजवून घ्या.
बटाटे शिजल्यानंतर त्यात साखर (Sugar) आणि फ्रेश क्रिम किंवा दूध मिक्स करा. आणि व्यवस्थित मिक्स करा.
यानंतर तुमचा शिरा तयार आहे. त्यावर चवीनुसार वेलची पावडर मिक्स करा. त्यानंतर सजावटीसाठी त्यावर ड्रायफ्रुट्स टाका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.