Navratri 4th Day: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पद्धत

Navratri 4th Day Kushmanda Devi Puja: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुशमांडा यांची पूजा केली जाते. या दिवशीचे महत्त्व, पूजा विधी आणि उपवासाचे नियम जाणून घ्या.
Navratri 4th Day
Navratri 4th DaySaam Tv
Published On

२२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते कूष्मांडा देवीची पूजा केल्याने आरोग्याच्या समस्या आणि जीवनातील दु:ख दूर होतात धन, किर्ती आणि उत्पन्नात वाढ होते.

Navratri 4th Day
Navratri Nine Days Fast: नऊ दिवस उपवास केल्याने शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल

दुर्गादेवीच्या चौथ्या दिवशी कूष्मांडा रूपाची पूजा कूष्मांडा देवीला आठ हात आहेत. दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलु, सिद्धी आणि निधींची माळ भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे. कूष्मांडा देवीची पूजा घरात केल्याने घरात सुख समृद्धी येते. कूष्मांडा माता सूर्यमालेच्या आतील जगात वास करते. मातेच्या शरीराचे तेज देखील सूर्यासारखे आहे तिचे तेज आणि प्रकाश सर्व दिशांना प्रकाशित करतात.

Navratri 4th Day
Rahu Gochar 2025: पुढील 1 वर्ष 'या' राशींना भोगावा लागणार त्रास, राहू निर्माण करेल अडचणी, हे उपाय आताच करा

कूष्मांडा देवीची पूजा-

1) सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर कूष्मांडा देवीची पूजा करा.

2) देवीच्या पूजेत लाल रंगाची फुले, जास्वंद आणि गुलाबाचे फूल आवर्जुन अर्पण करा.

3) कूष्मांडा देवीची पूजा केल्यानंतर देवीला गोड नैवेद्य दाखवा.

4) देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.

5) कूष्मांडा देवीची पूजा झाल्यानंतर ओम देवी कूष्माण्डायै नम: या देवी सर्वभूतेषु माँ कूष्मांडा रूपेण संस्थिता| या मंत्राचा जप करा.

Navratri 4th Day
Astro Tips: महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा हे सोपे ५ उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com