Weight loss Tips : नवरात्रीमध्ये आहारात या पदार्थांचा करा समावेश, वजन होईल झटक्यात कमी

Navratri Food : आजपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली आहे. या दरम्यान देवी दुर्गाची विशेष पूजा केली जाते. जर तुम्ही देखील या दिवसात उपवास करत असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा.
Weight Loss Tips
Weight Loss Tips Saam tv
Published On

Weight Loss Diet :

आजपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली आहे. या दरम्यान देवी दुर्गाची विशेष पूजा केली जाते. जर तुम्ही देखील या दिवसात उपवास करत असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा.

आपण उपवासादरम्यान बटाटे, मिठाई आणि तळलेले पदार्थ खातो. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढते. तसेच अॅसिडीटीचा देखील सामना करावा लागतो. त्यासाठी आहारात (Diet) फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल.

1. नारळ पाणी

दिवसाची सुरुवात तुम्ही नारळ पाण्याने करु शकता. यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते तसेच वजनही कमी होते. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे मिळतात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

2. सुका मेवा

उपवासात शरीराला व्हिटॅमिनची कमतरता जाणवते. यावेळी आहारात सुक्या मेव्याचा समावेश करा. काजू, बदाम, मनुका, अक्रोड आणि खजूर हे खा. यामुळे शरीराला फायबर मिळते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

Weight Loss Tips
Dry Skin Remedies : कोरड्या त्वचेमुळे चेहरा खराब दिसतोय? आहारात करा या सूपरफूडचा समावेश

3. फळे

आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करा. सफरचंद, केळी, टरबूज, खरबूज, पपई आणि द्राक्षे या फळांचे सेवन करा. फळे खाल्ल्याने शरीराला फायबर आणि भरपूर ऊर्जा मिळते.

4. ताक प्या

उपवासात अधिक द्रव पदार्थांचा समावेश करायला हवा. यासाठी तुम्ही तुमच्या जेवणात ताकाचा समावेश करा. दही खाण्याऐवजी लस्सी किंवा ताक, जिरे, मीठ घालून प्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com