Home Remedy For Cough: रात्री खूप खोकला येत असेल तर 'हे' 4 घरगुती उपाय करून मिळवा त्वरित आराम

Cough Problem: सध्या बदलत्या वातावरणामुळे खोकल्याच्या समस्या खूप वाढल्या आहेत. नाकातून पाणी येणे, कफ येणे आणि खोकला येणे यामुळे शांत झोपही येत नाही. अशा परिस्थितीत सतत खोकल्यामुळे श्वास घेणे देखील कठीण होते.
 Cough Problem
Home Remedy For Coughsaam tv
Published On

सध्या बदलत्या वातावरणामुळे खोकल्याच्या समस्या खूप वाढल्या आहेत. नाकातून पाणी येणे, कफ येणे आणि खोकला येणे यामुळे शांत झोपही येत नाही. अशा परिस्थितीत सतत खोकल्यामुळे श्वास घेणे देखील कठीण होते. दिवसा खूप खोकला येत असेल तर आपण लगेचच डॉक्टरांकडे जातो. पण रात्री अंधरुणावर पडताच येणारा खोकला तुम्हाला हैराण करत असेल तर काय? या प्रश्नाचं उत्तर आणि घरगुती सल्ला आम्ही तुम्हाला सागंणार आहोत.

 Cough Problem
Salary Increases: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार? वाचा....

रात्री खोकल्यासाठी उपचार

१. घरगुती उपाय

खोकल्यावर तुम्ही तुळशी, आले, हळद, तेजपत्ता, दालचिनी, इलायची, लवंग, काळे मिरे यांचा काढा घेऊ शकता. याशिवाय, गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाणी पिणे, आंघोळ करणे, ह्युमिडिफायर वापरणे हेही उपाय करू शकता.

खोकल्यावर घरगुती काढा कसा बनवावा?

20-25 तुळशीची पाने

अद्रक

3-4 तेजपत्ता

दालचिनी छोटा तुकडा

1 मसाला इलायची

2-3 इलायची

4-5 लवंग

4-5 काळे मिरे

 Cough Problem
Health Tips: डोळा फडफडतोय? शुभ-अशुभ असं काहीच नाही, असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण

रात्री खोकल्यासाठी उपचार

१. घरगुती उपाय

गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाणी पिणे, आंघोळ करणे, ह्युमिडिफायर वापरणे, पुदिना खाणे. खोकला कमी करण्यासाठी मध आणि आले हेही खूप प्रभावी उपाय आहेत. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असून सर्दी-खोकल्यासाठी ती खूप फायदेशीर आहे.

२. कोमट पाण्याने गुळण्या करा

घशातील कफ सुकल्यावर खोकला जास्त येतो. कोरडा खोकला असल्यास, कोमट पाण्याने गुळण्या करा. यामुळे खूप दिलासा मिळेल. हे ऍलर्जी आणि प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करते. म्हणून, रात्री कोमट पाण्याने गुळण्या करा.

३. अननसाचा तुकडा खा

अननसात असणारे ब्रोमेलेन, एक एंजाइम, खोकला कमी करण्यास आणि श्लेष्मा सोडण्यास मदत करू शकते. अननसाचा तुकडा खाणे किंवा नैसर्गिक अननसाचा रस पिणे चांगले, परंतु जर तुम्हाला अधिक केंद्रित स्वरूप आवडत असेल तर ब्रोमेलेन पूरक आहार देखील उपलब्ध आहे.

४. आलं

खोकल्यासाठी आले एक प्रभावी औषधी वनस्पती म्हणून काम करते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. आले चावल्याने खोकला कमी होतो. रात्रीच्या खोकल्यापासून आराम मिळविण्यासाठी, १ कप गरम पाण्यात २०-३० ग्रॅम किसलेले आले किंवा सुके आले घाला. त्यात मध किंवा लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

 Cough Problem
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला करा 'हा' नैवेद्य अर्पण; नोट करा सिंपल रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com