Saam Tv
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे हे जाहीर केले आहे.
पुर्वी महागाई भत्ता 50 टक्क्यांवर होता आता तो 53 टक्यांवर आला आहे.
म्हणजेच तुमच्या मुळ पगारात आता ३ टक्के वाढवून ती रक्कम मिळणार आहे.
तुमचा मासिक पगार जर 40,000 हजार असेल त्यात तुम्हाला 3% म्हणजे १२०० रुपये वाढवून मिळणार आहे.
तुम्हाला 1 जुलै 2024 पासून ते 31 जानेवारी 2025 पर्यंतची थकबाकी म्हणून 36,00 रुपये मिळणार आहेत.
हा महागाई भत्ता जुलै पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरकारी कर्मचारी ही मागणी राज्य सरकारला सातत्याने करत होते.
दरम्यान लाभाच्या विविध योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याच्या चर्चा असताना ही आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना देण्यात आली.