How To Active 5G Network : ११ मे १९९८ हा दिवस भारतासाठी अंत्यत खास मानला जातो. या दिवशी देशाला सर्वात मोठे यश मिळाले होते. २५ वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये पोखरण चाचणी रेंजमधून ही अणुचाचणी केली गेली होती.
आज भारताने तंत्रज्ञानात अनेक प्रगती केली. सध्या येथील प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. Airtel, Jio, Vodafone सारख्या मोठ्या टेलिकॉम (Telecom) कंपन्या विविध ठिकाणी 5G सुविधा देत आहेत.
एअरटेलचा दावा आहे की देशभरात 5G सेवांचे रोलआउट मार्च 2024 पर्यंत केले जाईल. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा (Internet) स्पीड बरोबर येत नसेल. आणि जर तुमच्या शहरात 5G सुविधा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या काही पायऱ्या फॉलो करून तुमच्या फोनमध्ये 5G सेवा सक्रिय करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.
तुम्हालाही 5G सेवेच्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क कसे सक्रिय करू शकता. ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे तेच 5G सेवा वापरण्यास सक्षम असतील. चित्रपट स्ट्रीम करण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेटची आवश्यकता असल्यास, तुमच्याकडे 5G मोबाइल हँडसेट असणे आवश्यक आहे.
स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क कसे सक्रिय करावे?
तुमच्या फोनच्या सेटिंग्ज मेनूवर जा.
कनेक्शन किंवा मोबाइल नेटवर्क पर्यायावर क्लिक करा.
नेटवर्क मोडवर टॅप करा आणि 5G/4G/3G/2G पर्याय निवडा.
तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात 5G नेटवर्क मोड पाहण्यासाठी होम स्क्रीनवर परत जा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.