Realme 5G Phone: लवकरच लॉन्च होणार Realme चा नवा 5G फोन ! जाणून घ्या फीचर्स व किंमत

Realme 11 Series Camera : Realme 11 सीरीज हा कॅमेरासाठी अधिक खास असणार आहे. यामध्ये 200 MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Realme Phone Series
Realme Phone SeriesSaam Tv
Published On

Realme 5G Phone Launch : Realme 11 ची सीरीज लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या सीरीजमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च होतील असे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ या नावाने लॉन्च केले जाऊ शकतात. परंतु, हे कधी लॉन्च होतील याविषयी कंपनीने सांगितले नाही.

परंतु, BIS सूचीनुसार, या फोनच्या (Phone) मॉडेलमध्ये 200 MP कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. 10 मे रोजी चीनमध्ये Realme 11 मालिका लॉन्च होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन्स व इतर फीचर्स

Realme Phone Series
Nothing Phone 2 Launch Date : Samsung-Xiaomi चे वाढले टेन्शन ! Nothing Phone 2 देणार का जबरदस्त टक्कर ? लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत

1. स्पेसिफिकेशन्स

  • Realme 11 Pro आणि 11 Pro + मॉडेल्समध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो FHD + रिझोल्यूशन सपोर्टसह येईल.

  • त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 120Hz असेल. फोन वक्र डिझाइन आणि प्रीमियम फीलमध्ये येईल.

  • Realme 11 5G मध्ये 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Realme 11 Pro मालिका स्मार्टफोन नवीन MediaTek Dimensity 7050 chipset सपोर्टसह सादर केला जाईल.

  • Realme 11 मालिका स्मार्टफोनमध्ये 16 GB LPDDR4x रॅम आणि 1 TB स्टोरेज सपोर्ट आहे. त्याच्या Pro आणि Pro+ मॉडेल्समध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाईल.

  • प्रो मॉडेलला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. तर प्रो + मॉडेलमध्ये 80W किंवा 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. हे तिन्ही स्मार्टफोन Android 13 वर काम करतील.

Realme Phone Series
Phone Launch in May : मे महिन्यात 5 स्मार्टफोन होणार लॉन्च; स्पेसिफिकेशन पाहून निवडा तुमचा आवडता फोन

2. कॅमेरा (Camera):

  • Realme 11 Pro स्मार्टफोनमध्ये 108MP चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर 2MP पोर्ट्रेट कॅमेरा दिला जाईल.

  • याशिवाय Realme 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. समोर 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.

  • Realme 11 Pro+ मध्ये हाच 32MP फ्रंट कॅमेरा असेल. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचा मुख्य कॅमेरा 64 MP चा असेल.

  • इतर कॅमेरा तपशील माहित नसले तरी. पण अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com