तुमची BPची गोळी नकली? पॅरासिटामॉलच्या टॅबलेटही बनावट?

FDA Action in Nagpur: तुम्ही जर या गोळ्या घेत असाल तर सावधान...कारण तुमच्या गोळ्या नकली असू शकतात. हे आम्ही नव्हे तर एफडीएनंच याचा पर्दाफाश केलाय. नेमक्या कोणत्या रुग्णालयात हा प्रकार समोर आलाय पाहूयात या रिपोर्टमधून .......
BP and Paracetamol Tablets
BP and Paracetamol Tabletssaam tv
Published On

ही बातमी बघण्याआधी तुमच्या घरातील बीपीची गोळी आणि पॅरासिटामॉलची गोळी हातात घ्या आणि ती तपासून पाहा, कारण ताप घालवणाऱ्या पॅरासिटामॉलनं ताप दिलाय. आणि बीपी नियंत्रणात ठेवणाऱ्या गोळीनंच बीपी वाढवलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय मेयो रुग्णालयात एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आलाय. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने केलेल्या नियमित तपासणीत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल ५०० एमजी आणि उच्च रक्तदाबावरील टेल्मिसार्टन 40 एमजी या दोन गोळ्या गुणवत्ता तपासणीत कशा अपयशी ठरल्या पाहा,

पॅरासिटामॉल 500 mg गुणवत्तेच्या निकषांवर नापास

टेल्मिसार्टन 40 mg गोळीवर डाग, विरघळण्यात अपयशी

इंदूरमधील औषध उत्पादक कंपनीच्या गोळ्या जप्त

जीएमसी आणि मेयो रुग्णालयातून औषध वाटप थांबवलं

बँच क्रमांक PTTC-108 च्या पॅरासिटामॉल ५०० mg गुणवत्तेच्या निकषांवर नापास झाली त्यामुळे तातडीनं १.२५ लाख गोळ्यांचा साठा मागे घेण्याचे आदेश देण्यात आले तर टेल्मिसार्टन 40 mg या हाय बीपीच्या गोळीचा बॅच क्रमांक CHPLT 416 मधील गोळ्यांवर डाग आढळले अन् विरघळण्याच्या चाचणीत ही गोळीही नापास झाली. या गोळ्यांची उत्पादक कंपनी ही इंदूरमधील औषध उत्पादक कंपनी असून जीएमसी अन् मेयो रुग्णालयातू या औषधांचे वाटप आता बंद करण्यात आलंय.

ही औषधं निकृष्ट होती. मूळ कंपनीचं औषध असून पण शरीरात विरघळण्याची क्षमता आणि गुणवत्तेत त्रुटी असल्याचं समोर आलंय. दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी या सरकारी रुग्णालयांमध्ये येतात. मात्र, जुलै महिन्यात पुरवठा झालेल्या सुमारे सव्वालाख पॅरासिटामॉलच्या गोळ्या थेट निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं. त्यामुळेच एफडीएने या दोन्ही बॅचच्या गोळ्यांचा साठा तातडीने जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता डॉक्टरांनी आपल्याला तपासल्यानंतर आपल्याला गोळ्या तपासाव्या लागणार का असा प्रश्न या कारवाईन उपस्थित झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com