Places to Visit in Monsoon for Couples : मुसळधार पावसात पार्टनरसोबत डेटवर जाण्यासाठी रोमँटिक ठिकाणे

Monsoon Special Romantic Tourist Places : अनेक प्रेमीयुगुलांना देखील बाहेर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचे वेध लागतात. त्यामुळे आज आम्ही खास कपल्ससाठी स्पेशल पावसाळ्यातील भन्नाट ठिकाणांची यादी आणली आहे.
Monsoon Special Romantic Tourist Places
Places to visit in monsoon for Couples Saam TV
Published On

जुलै महिना सुरू आहे आणि बाहेर सर्वत्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळतायत. मुंबई, पुण्यासह विविध शहरांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे. पावसाळा सुरु होताच भन्नाट ठिकाणी फिरणे, जागा एक्सप्लोअर करणे, मित्र-मैत्रिणींसह मजा मस्ती करणे सर्वांना आवडतं. त्यात अनेक प्रेमीयुगुलांना देखील बाहेर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचे वेध लागतात. त्यामुळे आज आम्ही खास कपल्ससाठी स्पेशल पावसाळ्यातील भन्नाट ठिकाणांची यादी आणली आहे.

Monsoon Special Romantic Tourist Places
Pune Tourist Places : पावसाळ्यात पुण्यातील 'या' ठिकाणांना द्या भेट

पवना तलाव

जोडीदारासोबत पावसात मौज-मजा करायाची असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. पवना तलाव पुण्यामध्ये आहे. लोणावळा रेल्वे स्थानकापासून जवळपास २० किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे. तुम्ही बाय रोड देखील येथे जाऊ शकता. फोटोशूट आणि कॉलिटी टाईमसाठी तुम्ही आजच पार्टनरसह येथे भेट देऊ शकता.

एम्प्रेस गार्डन

एम्प्रेस गार्डन सुद्धा पुण्यामध्येच आहे. पुण्यातील या गार्डनमध्ये तुम्हाला विविध रंगीबेरंगी फुलं पाहायला मिळतील. येथे असलेल्या बागेत अनेक रंगिबेरंगी झाडे लावण्यात आली आहेत. एम्प्रेस गार्डनमध्ये सर्वत्र हिरवीगार हिरवळ पसरलेली आहे. पावसाळ्यातील येथील नजारा बघण्यासारखा असतो. पार्टनरसह तुम्ही पुण्यात आले असाल तर येथे येऊ शकता.

माळशेज घाट

काही कपल्स बाहेर फिरण्याचे आणि लाँग ड्राइव्हचे फार शौकीन असतात. त्यांना सतत बाहेर तासंतास फिरत रहावे असे वाटते. त्यांच्यासाठी माळशेज घाट सुद्ध बेस्ट प्लेस आहे. तुम्ही पार्टनरसह दुचाकी किंवा चारचाकीने या ठिकाणी भेट देऊ शकता. माळशेज घाटात अनेक छोटे छोटे धबधबे आहेत. त्यामुळे तुम्हाला येथे मस्त पावसाचा आनंद सुद्धा घेता येईल.

कान्हेरी लेणी

कान्हेरी लेणी बोरिवली येथे आहे. तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर या लेणीला नक्की भेट द्या. पावसाळ्यात कान्हेरी लेणीचं दृश्य अतिशय नयनरम्य आणि मनमोहक असतं. येथे तुम्हाला सुंदर फोटोशूट सुद्धा करता येईल. कान्हेरी लेणीमध्ये काही स्तूप, शिल्प आणि कोरीव काम आहे. लेणीमध्ये बुद्धांच्या सुंदर मूर्ती आहेत. तसेच बौद्ध धर्माविषयी पाली भाषेत यावर काही माहिती लिहिण्यात आलीये.

Monsoon Special Romantic Tourist Places
Sahapur Tourist Places : पावसाळ्यात शहापुरजवळील 'या' ठिकांणाना नक्की भेट द्या, मन होईल ओलंचिंब

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com