ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुण्यापासून शिवाजीनगर भागात पाताळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महादेवाची पिंड असून संपूर्ण परिसर पावसाळ्यात हिरवाईने सजून जातो.
पुण्यापासून काही अंतरावर लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या दिवसात हमखास अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये सहलीचा आनंद घेण्यासाठी येतात.
लोणावळा आणि खंडाळा तसे जवळपास मात्र खंडाळ्यामध्येही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावत असतात.
पुण्यापासून पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी पवना धरण सर्वात मस्त ठिकाण आहे.
पावसाळ्यात प्रत्येक किल्ले असेल किंवा गडमाथ्याचा परिसर हिरवागार होतो. हे ही फिरण्याचा चांगला पर्याय आहे.
पुण्यापासून जवळच फिरायला जाण्याचा विचार असल्यास पाणशेत हे ठिकाण सर्वात चांगले आहे.
पावसाळ्यात कुटुंबियासोबत तुम्ही कामशेत या ठिकाणी जाऊ शकता. पुण्यापासून काही अंतरावर कामशेत हे ठिकाण आहे.
लोणावळ्यात येणारा प्रत्येक पर्यटक कार्ला लेणीवर जातो. तुम्हीही नक्की येथे जावा.