Ruchika Jadhav
पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीला निसर्गाच्या सानिध्यात फिरावं आणि रमावं असं वाटतं.
आज आम्ही या बातमीमधून अंबरनाथमधील काही प्रसिद्ध आणि ठरावीक ठिकाणं शोधली आहेत.
कोंडेश्वर हे अंबरनाथमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. दरवर्षी येथे लाखो भावीक दर्शनासाठी येत असतात.
या मंदिराबाहेर मागच्या बाजूने एक सुंदर नदी वाहते. पावसाळ्यात हे ठाकाण फार नयनरम्य दिसते.
अंबरनाथ आणि बदलापूरला जोडलेली बारवी नदी देखील अनेक पर्यटकांसाठी आवडचीचं ठिकाण आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या अगदी मधोमध चिखलोली गाव आहे. या गावात मोठं धरण देखील आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे फिरण्यासाठी येऊ शकता.
अंबरनाथचं शिव मंदिर संपूर्ण दगडांमध्ये कोरिवकाम करून बनवलेलं आहे. पावसाळ्यात येथील नजारा सुद्धा पाहण्यासारखा असतो.