Ruchika Jadhav
बदाम आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी असतात. त्याने स्मरनशक्ती सुद्धा वाढते.
त्यामुळे आज याच बदामांपासून बनवला जाणार शिरा किंवा हलवा घरीच कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊ.
या रेसिपीसाठी मोठ्या आकाराचे आणि ताजे बदाम विकत घ्या.
बदाम रात्रीच एक वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवा. रात्रभर बदाम यामध्ये भिजत राहुद्या.
बदाम भिजल्यानंतर त्याची साल काढून घ्या. बदाम भिजल्यामुळे त्याची साल सहज वेगळी होते.
सोललेले सर्व बदाम आणि दूध एकत्र मिक्सरला बाकीर करत याची पेस्ट बनवून घ्या.
त्यानंतर सर्व मिश्रण एका भांड्यात टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा. यात साखर आणि वेलची पूड मिक्स करा.
तयार झाला बदाम हलावा. हा हलवा आणखी छान दिसावा यासाठी त्यावर केसर सुद्धा ठाकू शकता.