Shreya Maskar
रोजच्या ऑफिसच्या कामातून वेळ काढून जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवायचा असल्यास ताम्हिणीचे सौंदर्य अनुभवा.
ताम्हिणी घाट पुण्यामध्ये वसलेला आहे.
ताम्हिणी घाटाचे सौंदर्य आपल्याला मनाला वेड लावते. ताम्हिणी घाटात हिरवळ, तलाव आणि धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल.
ताम्हिणी घाटावर तुम्ही मस्त फोटोशूट करू शकता. एकमेकांसोबत छान वेळ घालवू शकता.
ताम्हिणीला आल्यावर प्रसिद्ध ताम्हिणी धबधब्याला आवर्जून भेट द्या.
ताम्हिणी धबधबा डोंगराच्या उंचीवरून पडतो. या फेसाळलेल्या धबधब्याचे रूप सर्वांना मंत्रमुग्ध करणारे असते.
ताम्हिणीच्या घनदाट जंगलातून तुमही जंगल ट्रेकचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
मुंबई, पुण्याहून स्वत:च्या गाडीने तुम्ही ताम्हिणीला पोहोचू शकता.
आपल्या जोडीदारासोबत घालवलेले क्षण तुमच्यासाठी अविस्मरणीय राहतील.