
पावसाळा आनंदासोबत आजारांना ही आमंत्रण देतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची सुरक्षेसाठी शरीराची विशेष काळजी घ्या. पावसाळ्यातील ओल्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. डॉ. सदानंद शेट्ये म्हणतात की, "पावसाळ्यामध्ये ताप, घसा बसणे, पोटात कळा येणे अशी विविध प्रकारच्या समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे ६० टक्के वाढ होते. या ऋतूमध्ये सर्वत्र अशी आजारपणे दिसून येतात. हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि वेळच्यावेळी निदान करून घेणे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. "
पावसाळ्यात आढळून येणाऱ्या समस्या
सर्दी आणि फ्लू
पावसाळ्यातील दमटपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रभाव वाढतो. घसा बसणे, ताप, सांधे दुखी, स्नायू दुखी, डोकेदुखी, मळमळणे, डायरिया अशा समस्यांचा पावसाळ्यात उद्भवतात. सर्दीच्या तुलनेत फ्लूचा शरीरावर गंभीर परिणाम होतो.
फंगल इन्फेक्शन
पावसाळ्यात सर्वत्र ओलावा असतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. बुरशीजन्य संसर्ग वाढण्याची शक्यता पावसाळ्यात अधिक असते. ॲथलिट्स फूट, रिंगवर्म आणि यीस्ट इन्फेक्शन होते. शरीराला खाज येणे, त्वचा लाल होणे आणि सूज येणे ही यांची लक्षणे आहेत.
पोटाच्या समस्या
पावसाळ्यात हवामानातील गारव्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे आपल्याला आहराकडे विशेष लक्ष द्यावे लागेत. दूषित पाणी आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने डायरिया आणि फूड पॉयझनिंगसारखे आजार उद्भवतात. आतड्याचे आरोग्य धोक्यात येते. पोटात दुखणे, मळमळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
डेंग्यू- मलेरिया
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे जंतूंची पैदास होते. यामुळे आपले आरोग्य बिघडते. जगभरात डेंग्यूचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. ताप, हुडहुडी भरणे आणि घाम येणे ही मलेरियाची प्रमुख लक्षणे आहेत. तर ताप, गंभीर डोकेदुखी, डोळे दुखणे, स्नायू दुखणे आणि शरीरावर चट्टे येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत.
पावसाळ्यात आरोग्याची 'अशी' घ्या काळजी
स्वच्छता राखा
पावसाळ्यात आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. कारण घाणीमुळे मोठ्या प्रमाणात यामुळे रोगराई पसरते. साचलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करा. आपल्या हातांची विशेष स्वच्छता करा. त्वचा कोरडी ठेवा. मोकळे हवेशीर कपडे घाला. आपली नखे कापा आणि स्वच्छता ठेवा.
समतोल आहार
पावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी आजारांशी लढायला ताकद मिळते. किती ही मोह झाला तरीही रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा आणि त्याऐवजी घरामध्ये शिजविलेले ताजे अन्न खा. यामुळे जंतुसंसर्गाचा धोका कमी होईल. नेहमी उकळलेले आणि गाळलेले पाणी प्या. व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आपल्या आहारात समावेश करा.
सक्रिय रहा
कितीही पाऊस असला तरी व्यायाम चुकवू नये. बाहेर जाता येत नसल्यास घरी योगासने करावी. व्यायामामुळे स्नायू आणि हाडे बळकट राहतील. तसेच चांगली झोप लागेल. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना
पावसाळा सुरू होण्याआधी फ्लूचे इंजेक्शन घ्यावे. यामुळे आजारांचा धोका वाढतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.