Holi Skin Care Tips: होळीच्या रंगांने इन्फेक्शन होण्याची भीती? कसे कराल Skin Care

How To Prevent Skin Infection From Holi Color: होळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. यावेळी होळीचा सण रविवारी 24 तर सोमवार 25 मार्च रोजी रंगपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. लहान मुले असोत वा वृद्ध, प्रत्येकजण होळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
Skin Care Tips For Holi
Skin Care Tips For HoliSaam Tv
Published On

How to Protect Skin from Holi Colours

होळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. यावेळी होळीचा सण रविवारी 24 तर सोमवार 25 मार्च रोजी रंगपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. लहान मुले असोत वा वृद्ध, प्रत्येकजण होळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. लोक आपली जुनी भांडण विसरून एकमेकांना गुलाल लावतात. पण होळीच्या रंगांमुळे त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी (Skin Care) घेणेही गरजेचे आहे.

होळीच्या रंगांमध्ये हानिकारक (Harmful) रसायने असू शकतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ, खाज सुटणे, पिंपल येण्याची भीती असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला होळी खेळायची असेल तर चेहऱ्याला काही गोष्टी नक्की लावा. येथे अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचेला नुकसान होण्यापासून संरक्षण मिळेल.

खोबरेल तेल

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर खोबरेल तेल लावून झोपा. तेल लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, त्यानंतरच चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन होते आणि रंगांमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Skin Care Tips For Holi
Holi Thandai Recipe | यंदा होळीला घरच्या घरी 2 प्रकारच्या थंडाई बनवा

कोरफड जेल

जर तुम्ही होळी खेळणार असाल तर त्याआधी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावू शकता. जेल लावल्याने रंगामुळे त्वचेला हानी पोहोचवत नाहीत. यासोबतच ते त्वचेला मॉइश्चरायझ करते. तुम्ही एलोवेरा जेलचा थर चेहऱ्यावर लावू शकता.

व्हॅसलीन

होळी खेळण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर व्हॅसलीन देखील लावू शकता. त्यामुळे होळीचे रंग सहज निघतात. यासोबतच त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवते.

Skin Care Tips For Holi
Holi 2024: नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी पार्टनरसोबत अशी करा साजरी होळी

मॉइश्चरायझर

होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावावे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर प्रोटेक्शन लेयर तयार होईल. यासोबतच होळीच्या रंगांमुळे त्वचेला कोणतीही हानी होणार नाही. तसेच त्वचा हायड्रेटेड राहते. याशिवाय त्वचेवर सनस्क्रीन लावा. यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते आणि टॅनिंगची समस्या येत नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com