Baby Skin Care Tips : हिवाळ्यात नवजात बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी कशी घ्याल? या टिप्स फॉलो करा

New Born Baby Skin Care Tips : जर तुम्ही नुकतेच पालक झाले असाल तर पालकांच्या जबाबदाऱ्या समजून घेणे खूप महत्वाचे आहे. या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे.
Baby Skin Care Tips
Baby Skin Care TipsSaam Tv
Published On

Skin Care Tips :

जर तुम्ही नुकतेच पालक झाले असाल तर पालकांच्या जबाबदाऱ्या समजून घेणे खूप महत्वाचे आहे. या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे. थोडासा निष्काळजीपणाही त्यांना अनेक प्रकारच्या संसर्गांना बळी पडू शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी स्किन केअर प्रॉडक्ट्स (Products) निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आई-वडील बनणे, आनंदासोबतच काही जबाबदाऱ्याही घेऊन येते. बाळाचे पहिले रडणे, त्याला आपल्या मांडीवर घेणे, त्याचे नाजूक अवयव धरून ठेवणे... या सगळ्याचा अनुभव फारच आनंद देणारा आणि वेगळाच असतो.

लहान बाळाची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. कारण त्यांची त्वचा (Skin) अतिशय संवेदनशील असते. अशा स्थितीत जाहिराती पाहून त्यांच्यासाठी स्किन प्रॉडक्ट्स खरेदी करण्यापेक्षा त्यांच्या त्वचेसाठी काय चांगले आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार वस्तू खरेदी करा. चला जाणून घेऊया मुलांच्या त्वचेच्या काळजीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

Baby Skin Care Tips
Baby Care: पहिल्यांदाच वडील होणार असाल तर 'अशी' घ्या लहान बाळाची काळजी

बाळाची संवेदनशील त्वचा समजून घ्या

लहान बाळाची त्वचा मोठ्यांपेक्षा खूप पातळ असते, त्यामुळे प्रदूषण, हवामान आणि इतर गोष्टींचा सहज परिणाम होतो. अशा स्थितीत, त्यांच्या त्वचेसाठी रसायनमुक्त आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या प्रोडक्ट्सना प्राधान्य द्या.

योग्य प्रोडक्ट्स निवडणे

नवजात बाळाच्या त्वचेच्या काळजीसाठी विशेषत: नैसर्गिक, त्वचा तज्ज्ञांनी मंजूर केलेले प्रोडक्ट निवडा. जास्त रसायने, खनिज तेल आणि ऍलर्जी मुक्त म्हणून लेबल केलेली प्रोडक्ट. सौम्य क्लीन्सर, मॉइश्चरायझर आणि तसेच बाळाला डायपर घालणार असाल तर डायपर क्रीम हे त्वचेचे संरक्षण करणारे प्रोडक्ट खरेदी करू शकता. असे प्रोडक्ट्स बाळाच्या नाजूक त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण करण्यास मदत हेते.

Baby Skin Care Tips
Winter Travel: स्वर्गाहून सुंदर भारतातील Snow Fall ची ठिकाणं, एकदा भेट द्याच!

स्किनकेअर रूटीन सेट करा

बाळाच्या त्वचेची काळजी संक्रमण आणि इतर अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्यांची त्वचा निरोगी आणि मऊ ठेवण्यासाठी तसेच नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. तेल मसाज केल्यानंतर, सौम्य क्लिंजर वापरून आंघोळ घाला आणि आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावणे कधीही चुकवू नका. यामुळे मुलांची त्वचा मुलायम राहते.

डायपरिंग

डायपरमुळे होणाऱ्या सतत ओलाव्याच्या संपर्कामुळे बाळाच्या जांगेच्या तसेच शी-सुच्या ठिकाणी जळजळ होण्याचा धोका वाढतो. यासाठी वेळोवेळी डायपर बदलत राहणे गरजेचे आहे. डायपर काढून टाकल्यानंतर, कोमट पाण्याने किंवा बेबी वाइप्सने संपूर्ण भाग पुसून घ्या. यासाठी तुम्ही मऊ कापड वापरा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com