Mobile: १५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी; मुलांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय

Mobile Addiction: लहान मुलांच्या हातात सतत मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईलमुळे लहान मुलांचे नुकसान होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मुलांना मोबाईल न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mobile Addiction
Mobile AddictionSaam Tv
Published On

अनेक कुटुंबात मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत. सतत मोबाईल पाहण्याचे दुष्परीणाम समोर येत आहेत. या पाश्वभूमिवर महाराष्ट्रात 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. पाहूया कोणी घेतला हा क्रांतीकारी निर्णय आणि त्याला पालकवर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतोय.

15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंद

सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं मोबाईलचा वापर करताना दिसतायेत. अगदी जेवण करतानाही मुलांच्या हातात मोबाईल दिसतोय. मुलांचा स्क्रिन टाईम वाढल्यानं पालकही त्रस्त झालेत. कारण त्याचे मोठे दुष्परिणाम दिसायला लागलेत. मोबाईल दिला नाही तर मुलं चिडचिड करतात. मुलांचा हट्टीपणा वाढल्यानं ही एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

Mobile Addiction
Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची; MBBS केलं, हॉस्पिटलमध्ये नोकरी करत UPSC क्रॅक; IAS नागार्जुन गौडा यांची यशोगाथा

हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. वयाच्या 15 वर्षापर्यंत मोबाईलवर बंदी घातली आहे. बोहरी समाजाचे 53 वे धर्मगुरू डॉ. सय्यदना आलिकद्र मुफद्दल यांनी मुंबईत नालासोपारा इथं झालेल्या प्रवचनात समाजाला आदेश दिला. हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

धर्मगुरुंच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु

बोहरा समाजातील निर्णयाचे पालकांनी स्वागत केलं आहे. नाशिकमधील बोहरा समाजाच्या 1300 कुटुंबात मुलांनी मोबाइल वापरणे बंद केलं आहे.

कोणत्या देशात मोबाईल आणि सोशल मीडियाबाबत मोठे निर्णय घेण्यात आलेत ते पाहूया..

- ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

- स्पेनमध्ये मुलांच्या स्मार्ट फोन वापरण्यावर नियंत्रण

- स्वीडनमध्ये लहान मुलांना मोबाईल वापरण्याबाबत नियम

- आर्यलंड, फ्रान्स, कॅनडामध्ये 3 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी

- चिनमध्ये मुलांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदीs

Mobile Addiction
Success Story: कॉलेजमध्ये नापास; एकदा नाही तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS अनुराग कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

मोबाइलच्या अतिवापराने शारीरिक, मानसिक, कौशल्य विकासावर दुष्परिणाम होत आहेत. निद्रानाशाचाही मोठा धोका आहे. मोबाइल वापरणे बंद केल्याने मुलांचं पुस्तक वाचन वाढणार आहे. संवादकौशल्य वाढण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे इतर समाजानेही बोहरा समाजाच्या निर्णयाचं अनुकरण केलं तर मुलांच्या भवितव्यासाठी ते पूरकच ठरणार आहे.

Mobile Addiction
Success Story:३५ वेळा नापास, हरला नाही, जिद्दीच्या जोरावर दोनदा UPSC क्रॅक; IAS विजय वर्धन यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com