Mixer Grinder Blades: या पाच चुकीच्या पदार्थांमुळे खराब होते मिक्सरच्या भांड्यातील ब्लेड, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Mixer Jar Damage : मसाला वाटण्यासाठी जवळपास अनेक नवीन ब्रँडने मिक्सर ग्राइंडरची निर्मिती केली आहे.
Mixer Jar Damage
Mixer Jar DamageSaam Tv
Published On

Tricks to Sharp Mixi Blades: पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी पाटकणाचा वापर व्हायचा. पण बदलेल्या परिस्थितीनुसार व तंत्रज्ञानानुसार माणसांने यातही अधिक प्रगती केली आहे. मसाला वाटण्यासाठी जवळपास अनेक नवीन ब्रँडने मिक्सर ग्राइंडरची निर्मिती केली आहे.

मसाला (Spices) वाटण्यासाठी किंवा कोणताही पदार्थ लगेच वाटून मिळावा यासाठी मिक्सर आपल्या मदतीला येतो. सुट्टीच्या दिवशी किंवा घाईच्या वेळी आपण पटापट याच्या वापर करुन जेवण बनवू शकतो. परंतु, याचा वापर करताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो ज्यामुळे मिक्सरचे भांडे लगेच खराब होते. तुमचे मिक्सरचे भांडे देखील लगेच खराब होत असेल किंवा त्याच्या ब्लेडची धार निघून जात असेल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मिक्सरमध्ये चुकूनही हे पदार्थ वाटू नका त्यामुळे ब्लेड लवकर खराब होते जाणून घेऊया त्याबद्दल

Mixer Jar Damage
Best Rice for Cooking : भात बनवण्यासाठी सर्वात चांगला तांदूळ कोणता?

1. बटाटा (Potato)

अनेकांना सवय असते की, उकडलेला किंवा कच्चा बटाटा हा मिक्सरच्या भांड्यात वाटण्याची. परंतु, बटाट्यात असणारे स्टार्च हे जारच्या ब्लेडला नुकसान पोहोचवू शकतात. तसेच बटाटा चिकट असल्यामुळे ब्लेड खराब होते.

2. उडदाची डाळ

इडली (Idli) किंवा डोसा बनवताना उडदाची डाळ ही चुकूनही वाटू नका. उडदाची डाळ ही चिकट असल्यामुळे त्याची पेस्ट तयार करताना ती पुर्णपणे वाटली जात नाही. त्यामुळे मिक्सरचे ब्लेड खराब होते.

Mixer Jar Damage
Wheat For Best Chapati: चपातीसाठी कोणता गहू चांगला सिहोर की, लोकवान ?

3. फळे आणि भाज्या

आठवड्याभराचा सामान आणल्यानंतर आपण तो फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे फळे व भाज्या या अधिक गोठल्या जातात व कडक होतात. अशातच आपण त्या मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्याचे ब्लेड खराब होते.

4. मसाले

मसाला तयार करण्यासाठी बरेचदा गृहिणी दालचिनी, लवंगसारखे इतर मसाले वाटण्याचा प्रयत्न करतात यामुळे ब्लेड तुटू शकतो. तसेच जर या बेल्डचे बारीक तुकडे झाले तर मसाला खराब होण्याची शक्यता देखील असते.

Mixer Jar Damage
Dosa Making Tips : डोसा तव्याला चिकटणारच नाही; बनेल एकदम कुरकुरीत, फक्त या टिप्स फॉलो करा

5. कणिक

अनेकांना सवय असते की, कणिक कडक झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतात. कणिक मळल्यानंतर ते अधिक कडक व चिकट होते ज्यामुळे ते ब्लेडला चिकटते. यामुळे कणिक दळण्याचा पुन्हा प्रयत्न करु नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com