राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झालीय. MHT-CET-2024चा निकाल उद्या रविवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या अंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) परीक्षेसाठी ७ लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
याआधी परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या तारखेनुसार हा निकाल १९ जूनला जाहीर होणार होता. आता या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रक काढत निकालाची तारीख जाहीर केलीय. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org किंवा mahacet.in वर पाहू शकतील.
कसा चेक करा निकाल
अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
पुढील पेजवर Check MHT CET Result 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
त्यात विचारण्यात आलेला तपशील भरा.
लॉन इन केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
निकाल दाखवल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करू घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.