'NEET' परीक्षेत घोटाळा; देशभरात विद्यार्थी रस्त्यावर,परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

NEET' Exam Scam : नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. देशभरातून विद्यार्थ्यांमध्ये रोष बघायला मिळतोय. महाराष्ट्रातही उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. विरोधकांनीही फेर परीक्षा घेण्याची मागणी केलीये. पाहूया एक सविस्तर रिपोर्ट.
'NEET' परीक्षेत घोटाळा; देशभरात विद्यार्थी रस्त्यावर, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
NEET' Exam Scamshiksha
Published On

गिरीश निकम, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नवीन सरकार स्थापन झालं असतानाच देशभरातून विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरलेत. कारण वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेत 1600 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यानं मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे ही परीक्षा घेणारी एनडीए वादाच्या भोव-यात सापडलीय. या घोटाळ्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. तर कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा एनटीएनं केलाय.

दरम्यान या परीक्षेवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी संसदेत आवाज उठवणार असल्याचं सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात उडी घेतलीय. महाराष्ट्रातही या घोटाळ्याविरोधात तीव्र पडसाद उमटलेत. उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा, विदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटानेही फेरपरीक्षेची मागणी केली आहे.

घोटाळ्याचे आरोप काय ? आणि त्याला एनटीएचं काय उत्तर आहे ते पाहूया..

NEET चा कटऑफ एवढा जास्त कसा?

विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्याने कटऑफ वाढला

720 पैकी 719 आणि 718 मार्क कसे मिळाले?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एनटीए ने लॉस ऑफ टाईम आणि कॉम्पेंसेटरी मार्क दिल्याने 719 आणि 718 मार्क

NEET चे 6 टॉपर एकाच केंद्रावरचे कसे?

फिजिक्सच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नाचे दोन उत्तर बरोबर होते. विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क आणि लॉस ऑफ टाईमचे मार्क दिले.

गेल्या तीन वर्षांत किती विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आणि पात्र ठरले ते पाहूया.

2024

एकूण विद्यार्थी - 23 लाख 33 हजार 297

पात्र विद्यार्थी - 13 लाख 16 हजार 268

2023

एकूण विद्यार्थी - 20 लाख 87 हजार 462

पात्र विद्यार्थी - 11 लाख 45 हजार 976

2022

एकूण विद्यार्थी - 17 लाख 64 हजार 571

पात्र विद्यार्थी - 9 लाख 93 हजार 69

‘नीट’ परीक्षेला तमिळनाडूने प्रखर विरोध केला आहे. त्यामुळे नीटबाबत नवनिर्वाचित एनडीए सरकार काय भूमिका घेतंय ते महत्वाचं आहे. गुणवत्तापूर्ण भावी डॉक्टर निर्माण होण्यासाठी नीटला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मूळासकट काढून टाकण्याची गरज आहे. तसंच यंदा नीट देणा-या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी फेरपरीक्षा घेणं आवश्यक आहे.

'NEET' परीक्षेत घोटाळा; देशभरात विद्यार्थी रस्त्यावर, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
10th SSC Results 2024: दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नचा डंका! १२३ विद्यार्थ्यांना मिळाले शंभर टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com