10th SSC Results 2024: दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नचा डंका! १२३ विद्यार्थ्यांना मिळाले शंभर टक्के

Latur SSC result 2014 Maharashtra Board: शंभर टक्के गुण मिळविण्याची परंपरा दहावीच्या परिक्षेत कायम ठेवली आहे. तब्बल १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले आहेत.
दहावीचा निकाल
Latur SSC StudentsSaam Tv

राज्यामध्ये लातूरची मुलं हुशार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण यंदा लातूरच्या एकूण १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केलीय. त्यातून ही माहिती समोर आली आहे. दहावीचा एकूण निकाल यंदा ९५.८१ टक्के लागला आहे.

बारावीनंतर दहावीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्याची प्रतिक्षा आज संपली अन् दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात एकूण १८७ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर (Maharashtra 10th) टक्के मिळविले आहेत. त्यातील १२३ विद्यार्थी हे लातूर विभागातील आहे. त्यामुळे आता लातूर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण लातूरच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

दहावीचा निकाल
10th SSC Result : पोरांपेक्षा पोरीच ठरल्या सरस, गुणवंतांचा टक्काही वाढला; वाचा दहावीच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

मागील वर्षी २०२३ मध्ये राज्यामधील १५१ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले होते. त्यापैकी १०८ विद्यार्थी लातूरमधील (Latur) होते. २०२२ मध्ये राज्यातील १२२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले (SSC Results 2024) होते. त्यापैकी ७० विद्यार्थी लातूरमधील होते. यंदाही लातूरच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखल्याचं दिसतंय. सर्वत्र लातूरच्या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे.

दहावीचा निकाल
SSC Exam Result 2024 : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी; नागपूरचा निकाल सर्वात कमी

यावर्षी राज्यामधील ८१ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. ५ लाख ५८ हजार २१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून जास्त गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला होता, अशी माहिती राज्य मंडळानं दिलेली आहे. लातूर विभागीय मंडळात लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश (10th Class Result) आहे. या जिल्ह्यांतील ४०८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. १ लाख चार हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यातील ९९ हजार ५१७ विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेत. लातूर विभागाचा निकाल ९५.२७ टक्के जाहीर झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com